---Advertisement---

असे रंगणार फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमधील उपांत्यफेरीचे सामने

---Advertisement---

मुंबई । साखळी फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु महाराष्ट्राच्या महिला संघाला साखळी फेरीत दोन पराभवांना सामोरे जावे लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्ठात आले आहे.

महाराष्ट्र पुरुषांच्या अ गटात अव्वल असून अनुप कुमारचा हरियाणा दुसऱ्या स्थानावर राहिला. ब गटात सेनादल अव्वल स्थानी राहिले असून कर्नाटक दुसऱ्या स्थानी राहिला.

यामुळे ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जे संघ उपांत्यफेरीत समोरासमोर आले होते तेच संघ या स्पर्धेत समोरासमोर आले आहेत.

महिलांच्या अ गटात हिमाचल प्रदेश आणि पंजाब संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरेल असून ब गटात हरियाणा आणि भारतीय रेल्वे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे.

अशा होणार उपांत्य फेरीच्या लढती:

पुरुष गट:
महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
सेनादक विरुद्ध हरियाणा

महिला गट
हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा
भारतीय रेल्वे विरुद्ध पंजाब

हे सामने संध्याकाळी ५ वाजता एसआरपीएफ मैदान, जोगेश्वरी येथे होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment