झारखंडची राजधानी रांची येथे १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शनिवारी (दि. १६ एप्रिल) आणि रविवारी (दि. १७ एप्रिल) सामने पार पडले. यामध्ये महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे.
पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाला २ सुवर्ण पदक व ४ कांस्य पदके मिळाली आहेत. तसेच, २ रौप्य पदकेही मिळाली आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री संदीप पटारे, श्री संदीप पाटील, श्री बालाजी बुरूंगे यांनी काम पाहिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
फ्री स्टाइल मुले
१. कास्यं पदक – ४५ किलो धनराज शिर्के (पुणे) (वस्ताद पै भरत शिर्के यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
२. सुवर्ण पदक – ४८ किलो रोहन भडांगे (नाशिक) (जानता राजा कुस्ती केंद्र वस्ताद पै संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
३. सुवर्ण पदक – ५१ किलो नरसिंह पाटील (बॉयज स्पोर्ट्स वस्ताद पै रणजीत महाडिक व पै शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
४. कांस्य पदक – ५५ किलो आर्यन पाटील (कोल्हापुर) (वस्ताद पै सागर चौगुले ( राशिवडे ) यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
५. कांस्य पदक – ६० किलो तनिष्क कदम (पुणे) (सहयाद्री कुस्ती संकुल वस्ताद पै विजय बराटे यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
६. रौप्य पदक – ६५ किलो अजय कपरे (पुणे) (सहयाद्री कुस्ती संकुल वस्ताद पै विजय काका बराटे यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
७. रौप्य पदक – ९२ किलो ओमकार शिंदे (सहयाद्री कुस्ती संकुल वस्ताद पै विजय काका बराटे यांच्या मार्गदर्शखाली सराव करतो.)
८. कांस्य पदक – ११० किलो प्रतीक देशमुख (पुणे)
मुली
१. कांस्य पदक – ४० किलो श्रावणी लवटे (कोल्हापूर) (नाईस कुस्ती केंद्र पै संदीप पाटील यांच्या मार्गदर्शखाली सराव करते.)
२. रौप्य पदक – ४६ किलो संजीवनी ढाणे (सोलापूर पै ढाणे वस्ताद यांच्या मार्गदर्शखाली सराव करते.)
३. अहिल्या शिंदे. ४९ किलो (पुणे) (मारकड कुस्ती केंद्र. पै मारुती मार्कड यांच्या मार्गदर्शखाली सराव करते.)
४. कांस्य पदक – ५३ किलो धनश्री फंड (इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा)
५. कांस्य पदक- ६९ किलो सिद्धी खोपडे (ठाणे शहर)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ जिंकणाऱ्या पैलवानाबाबत जे घडलंय ते आख्ख्या राज्यासाठी लज्जास्पद!