हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (8 जानेवारी) खेळला गेला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमविर याला 4-0 असे गुणांवर पराभूत करत खिताबावर नाव कोरले.
अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे दोन मल्ल दाखल झालेले. पहिल्या उपांत्य फेरीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत हरियाणाच्या सोमविर याच्याकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या उपांत्य फेरीत अभिजीत कटके याला पुढे चाल मिळाल्याने तो अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरीत अभिजीत याने शक्ती व युक्ती यांचे योग्य प्रदर्शन करत 4-0 असा विजय संपादन केला.
अभिजीत कटके हा 2017 महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे. तसेच तो दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरीदेखील ठरला आहे. अभिजीत याच्या आधी 2013 मध्ये पुण्याच्याच अमोल बराटे यांनी ही मानाची गदा आपल्या नावे केली होती.
(Maharashtra Wrestler Abhijit Katke Won Hind Kesari 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या वादळी शतकामागे आहे ‘हे’ कारण, टी-20 मालिका जिंकल्यानंतर केला खुलासा
क्रिकेटमध्ये पुन्हा पवार पर्व! रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष