औंरंगाबाद| ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी उपांत्य फेरीत मुलांच्या गटात सहाव्या मानांकित तनुष घिलदयालने आराध्य क्षितिजचा 6-1, 4-6, 6-0 असा तर पाचव्या मानांकीत पुण्याच्या अर्णव पापरकरने प्रद्युम्न तोमरचा 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात एन. हर्षिनी हीने सोलापुरच्या आकृती सोनकुसरेचा 6-1, 6-3 असा तर दुस-या मानांकीत सोहनी मोहंतीने जानवी साईचा 6-4, 3-6, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात महाराष्ट्राचा अर्णव पापरकर व कर्णाटकचा तनुष घिलड्याल या दुस-या मानांकीत जोडीने छत्तीसगडच्या संप्रित शर्मा व महाराष्ट्राच्या प्रद्युम्न तोमर यांचा 6-2, 4-6(10-1) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- मुले
तनुष घिलदयाल (6)(कर्णाटक) वि.वि आराध्य क्षितिज (महाराष्ट्र)6-1, 4-6, 6-0
अर्णव पापरकर (5)(महाराष्ट्र) वि.वि प्रद्युम्न तोमर (महाराष्ट्र)6-1, 6-3
मुली
एन. हर्षिनी (कर्णाटक) वि.वि आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र) 6-1, 6-3
सोहनी मोहंती(2)(ओरिसा) वि.वि जानवी साई (कर्णाटक)6-4, 3-6, 6-1
दुहेरी: अंतिम फेरी: मुले
तनुष घिलदयाल(कर्णाटक)/अर्णव पापरकर(महाराष्ट्र) (2) वि.वि संप्रित शर्मा(छत्तीसगड)/प्रद्युम्न तोमर(महाराष्ट्र) (6) 6-2, 4-6(10-1)
महत्त्वाच्या बातम्या-
ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून २७५ खेळाडू सहभागी
प्रो कबड्डी २०२१: ‘बंगाल वॉरियर्स’चा सलग दुसरा विजय, ‘गुजरात जायंट्स’ला ३१-२८ ने नमवले