---Advertisement---

ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून २७५ खेळाडू सहभागी

---Advertisement---

पुणे| पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून विविध वयोगटात 275 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर येथे  25 ते  26   डिसेंबर 2021 या कालावधीत रंगणार आहे.

तसेच, ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 71000 रुपयांची पारितोषिक रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. ही स्पर्धा  9,13,17 वर्षांखालील आणि महिला गटात स्विसलीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील 9,13,17 वयोगटातील अव्वल दोन खेळाडूंनी निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी, तर महिला गटातील अव्वल चार खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन ट्रुस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक आश्विन त्रिमल, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, याप्रसंगी नुकताच ग्रँडमास्टर ठरलेल्या हर्षित राजाचा एमसीए व पीडीसीसी यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विसाव्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ २५००० डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीत मोयुका उचिजिमा, डायना मार्सिंकेविकाचा अंतिम फेरीत प्रवेश

हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’

हॅट्रिक ते ४०० कसोटी विकेट्स, ‘या’ ४ विक्रमांमध्ये हरभजन सिंगची बरोबरी करणे नाही सोपे काम..!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---