झारखंड राज्याची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवानांनी भीम पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण येथील युवा पैलवान सगळीकडे चमकले. या पैलवानांनी २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदके पटकावत इतिहासात पहिल्यांदाच सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.
कोण आहेत ते पदकविजेते कुस्तीगीर, चला पाहूयात-
१ – रौप्य पदक – ३८ किलो – ओंकार कराळे ( ठाणे जिल्हा ) रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे कुस्ती अकादमी पै. अमोल बुचडे यांच्याकडून प्रशिक्षण घेतो.
२ – रौप्य पदक – ४१ किलो – आदित्य जाधव ( कोल्हापूर ) सरवडे कोल्हापूर सागर पाटील सर. यांचा कडून प्रशिक्षण घेतो .
३ – सुवर्ण पदक – ५२ किलो – प्रणय चौधरी ( ठाणे जिल्हा ) रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे कुस्ती अकादमी पै. अमोल बुचडे यांचा कडून प्रशिक्षण घेतो .
४ – सुवर्ण पदक – ५७ किलो – तुषार पाटील ( कोल्हापूर ) भारतीय खेळ प्राधिकरण मुंबई साई पै.अजय सिंग, पै. अमोल यादव यांचा कडून प्रशिक्षण घेतो .
५ – रौप्य पदक- ६८ किलो – सोहमराज मोरे ( सातारा ) रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे कुस्ती अकादमी पै. अमोल बुचडे यांचा कडून प्रशिक्षण घेतो .
६. – रौप्य पदक- ७५ किलो – श्रीधर नाईक ( कोल्हापूर ) क्रिडा प्रबोधनी कोल्हापूर पै कृष्णात पाटील सर यांचा कडून प्रशिक्षण घेतो .
तसेच रांची,झारखंड येथे सुरू असलेल्या पहिल्या(1st) 20 वर्षाखालील जूनियर महिला ओपन नॅशनल रॅकिंग कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये
कु.वेदांतिका अतुल पवार 68 किलो-कांस्यपदक ( कोल्हापूर ) लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल,मुरगुड श्री. दादासो लवटे यांचा कडून प्रशिक्षण घेते.
कु. सायली राजाराम दंडवते 72 किलो-कांस्यपदक ( कोल्हापूर ) लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल,मुरगुड श्री. दादासो लवटे यांचा कडून प्रशिक्षण घेते. पहिल्या(1st) 20 वर्षाखालील जूनियर मुले ओपन नॅशनल रॅकिंग कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये पै. पार्थ शंकर कंधारे 63 kg ग्रीको-रोमन कांस्यपदक ( पुणे ) गुरुकुल कुस्ती संकुल , पुणे येथे आंतरराष्ट्रीय पै. शंकर कंधारे यांचा कडून प्रशिक्षण घेतो. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून तांत्रिक अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड , श्री नवनाथ ढमाळ , श्री मारुती सातव व श्री विकास पाटील यांनी काम केले व प्रशिक्षक म्हणून श्री संदीप पटारे , श्री संदीप पाटील, श्री सतीश पाटिल , श्री महालिंग खांडेकर व श्री नरेंद्र यांनी उत्तम जवाबदारी पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या दोनवर्षातील चढत्या आलेखाबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कौतुक केले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
पुण्याचा धीरज लांडगे करणार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व