---Advertisement---

मराठमोळ्या केदारने केले आपल्या चाहत्याला खुष!!!

On: बुधवार, मे 1, 2019 12:13 PM
---Advertisement---

-आदित्य गुंड

आज(1 मे) आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सध्या चेन्नईच्या क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये आहे.

काल(30 एप्रिल) संध्याकाळी या हॉटेलमध्ये आलेल्या एका छोट्या मुलाला छानसे सरप्राईज मिळाले. हा मुलगा आपल्या पालकांबरोबर हॉटेलमधून बाहेर पडत असताना त्याला चेन्नईचा फलंदाज केदार जाधव दिसला.

केदारचा चाहता असलेल्या ह्या मुलाला आपल्या आयडॉलला भेटण्याची इच्छा होती.मात्र आपण स्वतः जाऊन केदारशी कसे बोलावे? हे बहुधा त्याला कळले नसावे किंवा तितके धैर्य त्याच्याकडे नसावे.

चेकइन काउंटरला असलेल्या केदारला ह्या लहानग्याची समस्या लक्षात आली असावी.त्याने स्वतःच मग त्या मुलाला बोलावून घेतले आणि त्याच्याबरोबर फोटोही घेतला. आता मात्र आपले धैर्य एकवटून त्या मुलाने केदारला सांगितले,

“सर आय एम अ बिग फॅन ऑफ यू”

केदारनेही त्याला “थँक्स” म्हणत शेकहँड केला आणि आपल्या रूमकडे गेला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment