वनडे विश्वचषक 2023 मधील महत्त्वाचा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघ समोरासमोर आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या अति महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 171 धावांवर संपवला. मात्र, श्रीलंकेच्या शेवटच्या जोडीने शानदार फलंदाजी करत एक विश्वविक्रम रचला.
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या श्रीलंकेने आपला निम्मा संघ केवळ 70 धावांमध्ये गमावला होता. त्यानंतरही त्यांच्या डावाची पडझड सुरू राहिली. तळाच्या फलंदाजांनी थोडेफार योगदान देत श्रीलंकेला नऊ बाद 128 पर्यंत नेले होते. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी आली. महिश थिक्षणा व दिलशान मधुशंका यांनी अखेरच्या गडासाठी तब्बल 43 धावा जोडत संघाला 171 पर्यंत नेले. थिक्षणा याने 91 चेंडूंमध्ये 38 व दिलशानने 48 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या.
वनडे विश्वचषक इतिहासातील अखेरच्या गड्यासाठीची ही श्रीलंकेसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. यासोबतच वनडे विश्वचषकात अखेरच्या गड्यासाठी सर्वाधिक चेंडू खेळलेली जोडी देखील बनण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांनी तब्बल 83 चेंडू खेळून काढले. तसेच, विश्वचषकात नऊ किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना महिश थिक्षना याने सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम बनवला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ऍंडी बिकेल याचा 83 चेंडूंचा विक्रम मोडीत काढला.
(Maheesh Theekshana and Dilshan Mahdushanka register the highest-ever 10th wicket partnership for Sri Lanka in ODI World Cups)
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप