---Advertisement---

‘दोघे नेट्समध्ये चांगले खेळतायत’; रोहित-इशानचा गोलंदाजांपुढे उठतोय बाजार, तरीही प्रशिक्षकांकडून पाठराखण

On: शुक्रवार, एप्रिल 22, 2022 6:00 PM
Ishan Kishan and Rohit Sharma
---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या संघाची सर्व गणिते सध्या बिघडली आहेत. आयपीएल २०२२ मध्ये हा संघ सलग ७ पराभवांसह गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. काही मोजके खेळाडू वगळता मुंबई संघातील इतर खेळाडूंचे सुमार प्रदर्शन यासाठी कारणीभूत ठरते आहे. मुंबईच्या फ्लॉप ठरणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर इशान किशन यांचाही समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या आयपीएल २०२२ मधील आपल्या सातव्या सामन्यात रोहित आणि इशान भोपळाही न फोडता माघारी परतले. आता मुंबई संघाचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी या दोन्ही खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रतिक्रिया दिली आहे. 

जयवर्धने (Mahela Jayawardene) म्हणाले की, “असे चढ-उतार येत राहतात. इशानने (Ishan Kishan) सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्यानंतर त्याच्या प्रदर्शनात बिघाड होत गेले. रोहित (Rohit Sharma) खरोखरच चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने मारत आहे. तो चांगली सुरुवात करत आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तसेच पुढे बोलताना जयवर्धने म्हणाले की, भलेही रोहित आणि इशान प्रत्यक्षात मैदानावर चांगले खेळू शकत नसतील. तरीही नेट्समध्ये हे दोन्हीही फलंदाज चांगले खेळत आहेत.

याबद्दल बोलताना जयवर्धने म्हणाले (Jayawardene On Ishan & Rohit) की, “जेव्हा तुम्ही सराव सत्रात चांगली फलंदाजी करता आणि प्रत्यक्षात मैदानावर स्वस्तात बाद होता. तेव्हा तुम्हाला वाटू लागते की, गोष्टी तुमच्या बाजूने घडत नाहीयत. मी सुद्धा एक फलंदाज राहिलो आहे आणि हा त्यातील एक भाग आहे. चिंता तेव्हा वाटायला हवी, जेव्हा फलंदाज चेंडूला योग्य पद्धतीने हिट करू शकत नसतो किंवा त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. परंतु इशान आणि रोहित दोघेही खेळपट्टीवर आणि नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहेत.”

इशान आणि रोहितच्या आयपीएल २०२२मधील आकड्यांवर नजर टाकायची झाल्यास, दोघांनाही अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. इशानने आतापर्यंत ७ सामने खेळताना २ अर्धशतकांच्या मदतीने १९१ धावा केल्या आहेत. तर रोहितने ७ सामन्यांमध्ये ११४ धावा केल्या आहेत. त्याला आतापर्यंत या हंगामात एकही अर्धशतक करता आलेले नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘तूने तो बराबर बिठाके रखा था एक आदमी’; जडेजा-सूर्यकुमारमधील मैत्रीपूर्ण संवादाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अखेरच्या षटकात धोनीचीच हवा! २० वे षटक सुरू होताच माहीचा दिसतो रुद्रावतार, पाहा आकडेवारी

MIvsCSK: सामना विजयानंतर जडेजाने केले मॅच फिनिशर धोनीचे कौतुक, आपल्या चुकीबद्दलही दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---