---Advertisement---

‘तूने तो बराबर बिठाके रखा था एक आदमी’; जडेजा-सूर्यकुमारमधील मैत्रीपूर्ण संवादाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शुक्रवार, एप्रिल 22, 2022 5:18 PM
Jadeja- Suryakumar-Friendly-Banter
---Advertisement---

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघांचे सध्या ग्रह फिरलेले दिसत आहेत. भारतातील मुंबई, पुण्याच्या मैदानांवर सुरू असलेल्या आयपीएल २०२२च्या साखळी फेरी सामन्यांमध्ये या संघांचे प्रदर्शन सुमार राहिले आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर उभय संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नईने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा आणि मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण आणि मजेशीर संभाषण झाले.

भलेही मुंबईला चेन्नईविरुद्धचा सामना (MI vs CSK) जिंकता आला नाही. पण मुंबईकडून सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) नेहमीप्रमाणे प्रशंसनीय खेळी केली. त्याने १५२.३८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची झटपट खेळी केली. यादरम्यान त्याने मैदानाच्या चहुबाजूंना फटकेबाजी केली होती, ज्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. परंतु अखेर मिशेल सँटनरने मुकेश चौधरीच्या हातून त्याला झेलबाद केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सामन्यानंतर जडेजा (Ravindra Jadeja) या खेळीवरून सूर्यकुमारला गमतीशीर तक्रार करताना (Jadeja & Suryakumar Friendly Banter) दिसला. जडेजा हसत हसत सूर्यकुमारला म्हणतो की, “भावा, मैदानातील एक तरी बाजू आमच्यासाठी सोडत जा, जेणेकरून आम्हीही थोडी फटकेबाजी करू शकतो. कधी इथे मारतो, कधी तिथे मारतो.”

यावर उत्तर देताना सूर्यकुमारही त्याला म्हणतो की, “तू पण मला झेलबाद करण्यासाठी बरोबर एकाला बसवून ठेवले होते.” यावर जडेजा त्याला म्हणतो, “हो. इथच बसवून ठेवला होता. मला माहिती होते, इथे कधी-ना-कधी एक तरी चेंडू येईल.”

एका बाजूला उभा राहून तिलक वर्मा त्यांच्यातील हे मजेशीर संभाषण ऐकत होता. शेवटी आपल्यातील हा संवाद संपल्यानंतर सूर्यकुमार आणि जडेजा एकमेकांची विचारपूस करतात. मुंबई संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान मुंबईचा संघ भलेही या हंगामात सुमार कामगिरी करत असला तरीही, सूर्यकुमारची बॅट मात्र तळपत आहे. त्याने या हंगामात ५ सामने खेळताना ५८ च्या सरासरीने २३२ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ षटकारांचाही समावेश आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अखेरच्या षटकात धोनीचीच हवा! २० वे षटक सुरू होताच माहीचा दिसतो रुद्रावतार, पाहा आकडेवारी

MIvsCSK: सामना विजयानंतर जडेजाने केले मॅच फिनिशर धोनीचे कौतुक, आपल्या चुकीबद्दलही दिली प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---