भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध फिनिशर एमएस धोनी आणि साक्षी सिंग यांच्या लग्नाला आज (०४ जुलै) १२ वर्षे पूर्ण झाली. धोनीने ४ जुलै २०१० रोजी साक्षी बरोबर काही खास मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते.
साक्षीने (Sakshi Singh) नुकतेच सांगितले होते की, धोनीबरोबर (MS Dhoni) तिची पहिली भेट कोलकाता येथील एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती त्याला ताज हॉटेलमध्ये भेटली, जिथे ती इंटर्नशिप करत होती. धोनीला साक्षी आवडली आणि त्याने साक्षीचा नंबर घेऊन तिच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.
साक्षी धोनीसाठी खूप भाग्यवान असल्याचे सिद्ध झाले. कारण २०१० मध्ये लग्नाच्या एका वर्षांनंतर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वनडे विश्वचषकावर आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं होतं.
यानंतर, साक्षीने २०१५ मध्ये विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच मुलगी झिवाला जन्म दिला. यावेळी धोनी तिच्यासोबत नव्हता. जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धोनीने आपली मुलगी झिवाचा चेहरा पाहिला होता.
धोनी सुरुवातीपासूनच सोशल मीडिया आणि अगदी मीडियापासूनही लांब राहत आला आहे. परंतू जेव्हा जेव्हा कोणी धोनीबद्दल प्रश्न उपस्थित करतं किंवा त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा साक्षी नक्कीच पुढे येऊन त्यास योग्य प्रत्युत्तर देते.
ट्रेंडिंग घडामोडी-
सुरुवातीला साक्षी धोनीला नव्हते आवडत क्रिकेट; माहीच्या ‘या’ ३ गोष्टींमुळे बनली क्रिकेटची चाहती
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पंतची तुलना थेट ब्रायन लाराशी केली, म्हणाला…
पंत आणि जडेजाने प्लॅनिंग करून इंग्लंडला चोपलंय! व्हिडिओमध्ये केलाय खुलासा