लॉकडाऊन दरम्यान माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धोनीने त्यातच पोल्ट्री फार्म करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीने झाबुआच्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या विनोद मेडाकडे कडकनाथच्या दोन हजार पिल्लांची मागणी केली आहे. धोनीने यासाठी आधीच एक लाख रुपये संस्थेत जमा केले आहेत. विनोद 15 डिसेंबर रोजी धोनीच्या फार्म हाऊसवर या कोंबड्यांची पिल्ले पोहोचवण्यासाठी जाणार आहे.
धोनीने ही मागणी आपला जुना मित्र आणि पशुवैद्यकीय डॉक्टर कुल्डु यांच्या मदतीने केली आहे.
कडकनाथ ही कोंबडीची एक खास प्रजाती आहे. या कोंबडीचे चोच, तुरा आणि नखापर्यंत सर्व काही काळ्या रंगाचे असते. या कोंबडीत प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यात चरबी कमी प्रमाणात असते. यातील एका कोंबडीची किंमत ही हजार रुपयांहून अधिक असते.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्त झालेला धोनी आता करणार बळीराजाची मदत, घेऊन येतोय शेतकऱ्यांसाठी…
-व्हिडीओ- अखेर क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने सुरु केली ऑरगॅनिक शेती, ट्रॅक्टरने केली…
-धोनीने वाचवला पक्ष्याचा जीव; मुलगी झिवाने शेअर केले फोटो