मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी महिपाल लोमरोर याला लाखोंमध्ये पैसे मोजत फ्रँचायझींनी विकत घेतले आहे.
लोमरोर हा भारताचा अनकॅप्ड खेळाडू असला तरीही त्याला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. २०१८ पासून तो आयपीएलमध्ये खेळतो आहे. यंदा तो ४० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला ९५ लाख रुपयांना विकत घेतले आहे.
Mahipal Lomror is SOLD to @RCBTweets for INR 95 Lakh#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
लोमरोर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांकडून खेळला आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये ११ सामने खेळले असून १८७ धावा केल्या आहेत. आता आयपीएळ २०२२ मध्ये हा फलंदाजी अष्टपैलू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कशी कामगिरी करतोय हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बावाची IPL लिलावात हवा! वर्ल्डकपमधील कामगिरीने वाढला भाव, पंजाबने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला ‘सुपरकिंग’
मेगा ऑक्शनदरम्यान रंगली २ चेहऱ्यांची चर्चा, अँकर दिशा आणि भावनाबद्दल जाणून घ्या सर्वकाही