पंजाब किंग्जचा प्रभसिमरन सिंग आयपीएल 2023मध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. शनिवारी (13 मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंग याने वादली खेळ दाखवत आपले शतक पूर्ण केले. अवघ्या 61 चेंडूत त्याने हे शतक साकारले. प्रभसिमरन एक अनकॅप्ट खेळाडू असून आयपीएल इतिहासातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले आहे. पंजाब किंग्जचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरत असताना त्याचे शतक संघासाठी खूपच महत्वाचे ठरले.
दरम्यान, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स शनिवारी (13 मे) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आमने सामने आले होते. दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर पंजाब किंग्जचे फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले. प्रभसिमरन सिंग () सोडला तर एकही पंजाबचा फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. प्रभसिमरनने या सामन्यात एकूण 65 चेंडूत खेळून 103 धावा केल्या.
19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुमेश कुमारने त्याला त्रिफळाचीत केले. सॅम करन याने 24 चेंडूत 20, तर सिकंदर रजा याने 7 चेंडूत 11 धावा करून विकेट गमावल्या. या तिघांव्यतिरिक्त पंजाबचे एकूण 5 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. पंजाबने निर्धारित 20 षटकांमध्ये 7 बाद 167 धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजी आक्रमणातील ईशांत शर्मा सर्वाधिक प्रभाव पाडू शकला. ईशांतने तीन षटकात 27 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, प्रविण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(MAIDEN IPL CENTURY BY PRABHSIMRAN SINGH…!!)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
6, WD, 6, W, 6, 6, 6 । अभिषेकमुळे हैदराबादच्या हातचा सामना निसटला, स्टॉयनिस-पूरनचे वादळ
भारतीय संघाच्या महिला अष्टपैलूने उरकला साखरपुडा, मंधाना-जेमिमाने लावली हजेरी






