---Advertisement---

आता अमेरिकेतही ‘सुपर किंग्स’! सीएसकेच्या ‘या’ चॅम्पियन्सना घेऊन बनवला संघ

---Advertisement---

अमेरिकेत नव्याने सुरू होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी आता संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिस नाईट रायडर्स व एमआय न्यूयॉर्क यांनी आपल्या संघांची घोषणा केल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीच्या टेक्सास सुपर किंग्स या संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गज टी20 खेळाडूंचा समावेश आहे.

टेक्सास सुपर किंग्स यांच्याकडून 7 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावाची घोषणा केली गेली. यामध्ये ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, डेवॉन कॉनवे, मिचेल सॅंटनर, डॅनियल सॅम्स, डेव्हिड मिलर व गेराल्ड कोएत्झे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रायुडू याने आयपीएल अंतिम सामन्यानंतर सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. जगभरात मिळून इंडिया सिमेंट समूहाच्या मालकीची ही तिसरी फ्रेंचाईजी बनली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स व एसए टी20 मध्ये जो’बर्ग सुपर किंग्स असे संघ त्यांच्या मालकीचे आहेत.

या खेळाडूंसह टेक्सास फ्रेंचायसीने आपल्या प्रशिक्षकांच्या नावाची देखील घोषणा केली. चेन्नई व जो’बर्ग प्रमाणेच या संघाचा मुख्य प्रशिक्षक देखील स्टीफन फ्लेमिंग हा असेल. गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका एरिक सिमन्स तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून एल्बी मॉर्केल हे जबाबदारी सांभाळतील.

एमएलसी स्पर्धेत चेन्नई व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स व केकेआर यांच्या मालकीचे देखील संघ आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे हे सिएटेल ओरकास संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन व सॅन फ्रान्सिस्को या शहरांचे देखील संघ स्पर्धेत सहभागी होतील. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला असून, या खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाईल. स्पर्धेला 13 जुलैपासून सुरुवात होईल. तर, अंतिम सामना 30 जूलै रोजी खेळण्यात येईल.

(Major League Cricket MLC Team Texas Signed Conway Miller And Other T20 Stars)

महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---