---Advertisement---

न्यूयॉर्कमध्ये वाढली ‘एमआय फॅमिली’! मेजर लीग क्रिकेटसाठी 9 धुरंधर करारबद्ध

On: बुधवार, जून 14, 2023 7:15 PM
---Advertisement---

अमेरिकेत नव्याने सुरू होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी आता संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिस नाईट रायडर्स यांनी आपल्या संघाची घोषणा केल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय न्यूयॉर्क या संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गज टी20 खेळाडूंचा समावेश आहे.

एमआय न्यूयॉर्क यांच्याकडून 9 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावाची घोषणा केली गेली. यामध्ये कायरन पोलार्ड, राशिद खान, ट्रेंट बोल्ट व कगिसो रबाडा यांचा समावेश आहे. जगभरात मिळून रिलायन्स समूहाच्या मालकीची ही पाचवी फ्रेंचाईजी बनली. आयपीएल व वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स, इंटरनॅशनल लीग टी20 मध्ये एमआय इमिरेट्स व एसए टी20 मध्ये एमआय केपटाऊन असे संघ त्यांच्या मालकीचे आहेत.

संघाने खेळाडूंसोबतच आपल्या सपोर्ट स्टाफची देखील घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू रॉबीन पीटरसन संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जे अरुणकुमार तर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लसिथ मलिंगा काम पाहिल. तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी जेम्स पेमेंट हे सांभाळतील.

एमएलसी स्पर्धेत मुंबई व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स व केकेआर यांच्या मालकीचे देखील संघ आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला असून, या खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाईल. स्पर्धेला 13 जुलैपासून सुरुवात होईल. तर, अंतिम सामना 30 जूलै रोजी खेळण्यात येईल.

एमआय न्यूयॉर्कने करारबद्ध केलेले खेळाडू- कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, राशिद खान, कगिसो रबाडा, निकोलस पूरन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड विजे, जेसन बेहरनडॉर्फ व टीम डेव्हिड.

(Major League Cricket Team MI New York Announced International Players Include Pollard Rashid Ranada)

महत्वाच्या बातम्या –
सेहवाग-गावसकरांना नैतिकतेचे धडे देणारा गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर, म्हणाले, “तू करून बसला अन्…”
मैदानावर न उतरताही अश्विन-पंतने राखली टीम इंडियाची लाज! वाचा नक्की काय घडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---