दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज मखाया एंटिनी यांचा मुलगा थांटो एंटिनी सध्या मुंबईत क्रिकेटचे धडे घेत आहे. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकुर या भारतीय क्रिकेटपटूंना घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड थांडो एंटिनीला प्रशिक्षण देत आहेत. २०१८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू सध्या बोरीवली उपनगरीय क्षेत्रातील स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये लाड यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे.
मखाया एंटिनी (Makhaya Ntini) त्याच्या कारकिर्दीत दक्षिण अफ्रिका संघासाठी १०१ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ३९० विकेट्स नावावर केल्या. आता त्यांचा मुलगा थांडो एंटिनी (Thando Ntini) त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. थांडो सध्या २१ वर्षाचा आहे आणि त्याच्या वडिलांना एका भारतीय खेळाडूकडून दिनेश लाड (Dinesh Lad) यांची माहिती मिळाली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनेश लाड याविषयी बोलताना म्हणाले की, ‘तो रेल्वे संघातील माझ्या एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून इथपर्यंत आला. माझा विद्यार्थी लीजेंड्स टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सहायक होता आणि त्यानेच माझ्याविषयी मखायाला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत सध्या क्रिकेटचा हंगाम संपला आहे आणि अशात थांडो त्याच्या खेळीत सुधार करण्यासाठी इथे आला आहे. आम्ही बुधवारी सराव सुरू केला आहे आणि मी त्याच्या काही चुका सुधारल्या देखील आहेत. तो २ जूनपर्यंत इथे राहील.’ लाड यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हा देखील खुलासा केला की, ते थांडोकडून कसल्याही प्रकारची फीस घेणार नाही.
दिनेश लाड त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी एकादा रोहित शर्माला एका कॅम्पमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देण्याचे ठरवल्यावर रोहित स्वतःची शाळा देखील बदलली. सुरुवातीला तो गोलंदाज होती आणि लाडच्या मार्गदर्शनानंतर रोहित एक उत्कृष्ट फलंदाज बनला. रोहित सध्या जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा द्विशतकी खेळी केली आहे.
थांडो एंटिनीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत १४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३२ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. ९८ धावा खर्च करून ४ विकेट्स त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. फलंदाजी १३ च्या सरासरीने १९४ धावांची नोंदही त्याच्या नावावर आहे. लिस्ट ए मध्ये खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये २१ आणि टी-२० मधील १४ सामन्यात १६ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर
वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय