भारतीय क्रिकेट संघाचे दीपक चाहर आणि राहुल चाहर यांची बहीण मालती चाहर नेहमीच चर्चेत असते. मालती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यामातूने चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने यापूर्वी वेब सीरीजमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलेले आहे. त्यानंतर आता ती लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. चाहत्यांना ती एका तमिळ चित्रपटात दिसणार आहे.
मालती पेशाने एक मॉडेल आहे आणि ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मालती लवकच एका तमिल चित्रपटाच्या माध्यमातून तिचे माठ्या पडद्यावरील पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी मालतीने स्वत: या गोष्टीची माहिती दिली होती. मालतीने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून माहिती दिली होती की, ती नयनतारा आणि विग्नेश शिवान यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवला जाणारा चित्रपट ‘वॉकिंग टॉकिंग स्ट्रॉबेरी आयस्क्रीम’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर विनायक आहेत.
https://www.instagram.com/p/CVj5NYqP9jM/
मालतीने यापूर्वी अनेक जाहिरातींसाठी काम केले आहे. तसेच तिने लेट्स मॉरी. कॉम या वेब सीरीज मध्येही काम केले आहे. मालतीने तिचा भाऊ दीपक चाहर आणि चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्रावोसोबत त्यांच्याच गाण्यावर डान्स केला होता. यानंतर मालती पहिल्यांदा चर्चेत आली होती.
मालती एक सुप्रसीद्ध मॉडेल असून लोकप्रियतेमध्ये तिच्या दोन्ही क्रिकेटपटू भावांपेक्षा कमी नाही. मालतीला तिच्या इंस्टाग्रामवर ६ लाख ३ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी दीपक चाहरने स्टेडियममध्ये त्याच्या प्रेयसीला प्रपोज केला होता, त्यानंतर तिने यासंदर्भात पोस्ट करून त्याचे अभिनंदन केले होते. तसेच भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर दीपक चाहरने महत्वाची खेळी करून सामना जिंकवल्यानंतरही तिने एक खास व्हिडिओ शेअर केला होता. मालतीने यापूर्वी २००९ मध्ये मिस इंडिया अर्थ आणि २०१४ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकला मुंबई इंडियन्स रिटेन करण्याची शक्यता नगण्य! ‘या’ ५ संघांची असेल अष्टपैलू खेळाडूवर नजर
पंजाब विरुद्ध ऋतुराजचा ‘रुद्रावतार’, ८० धावांच्या खेळीसह महाराष्ट्राला ७ विकेट्सने मिळवून दिला विजय