आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्री किंवा अन्य खेळात चमकणाऱ्या महिला खेळाडूंशी लग्न केले आहे. अगदी परदेशातील महान क्रिकेटपटूंनीही भारतीय अभिनेत्रींशी विवाह केले आहेत.
काही क्रिकेटपटूंनी आपल्या जोडीदाराचे प्रोफेशन पाहण्यापेक्षा आपल्या लहानपणापासूनच्या मैत्रिला महत्त्व दिले आहे. परंतु काही असेही क्रिकेटपटू आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे.
जगात केवळ तीन अशा जोड्या आहेत, ज्यांतील दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्यात एक जोडी श्रीलंकेची, एक इंग्लड तर एक ऑस्ट्रेलियाची आहे. इंग्लंडच्या जोडीतील रुथ प्रिडेऑक्स या महिला क्रिकेटपटूचा तर श्रीलंकेच्या जोडीतील गाय दे अल्विस या पुरुष क्रिकेटपटूचा मृत्यु झाला आहे. male cricketer who are married to female cricketers.
३. राॅजर प्रिडेऑक्स- रुथ प्रिडेऑक्स ( Roger Prideaux & Ruth Westbrook ,England )
३१ जुलै १९३९ रोजी जन्म झालेले राॅजर प्रिडेऑक्स इंग्लंडकडून इंग्लंडकडून ३ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी २०.४०च्या सरासरीने १०२ धावा केल्या. ते तब्बल ४४६ प्रथम श्रेणी सामने खेळले व यात त्यांनी ३४.२९च्या सरासरीने २५१३६ धावा केल्या.
त्यांनी रुथ प्रिडेऑक्स या इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूशी लग्न केले. आतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी लग्न केल्याची ही पहिलीच घटना होती.
रुथ प्रिडेऑक्स इंग्लंडकडून ११ कसोटी सामने १९५७ ते १९६३ या काळात खेळल्या. त्यांचा जन्म १२ जुलै १९३० रोजी झाला. त्या राॅजर यांच्यापेक्षा ९ वर्षांनी मोठ्या होत्या. पुढे १९८८मध्ये त्या इंग्लंडच्या महिला संघाच्या पुर्णवेळ प्रशिक्षक झाल्या.
तसेच त्या प्रशिक्षक असतानाच इंग्लंडने १९९३साली महिला विश्वचषक जिंकला. इंग्लंड संघाने १९९० साली क्रिकेटमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीचे श्रेय हे रुथ यांनाच जाते. वयाच्या ८५व्या वर्षी २०१६मध्ये त्यांचा मृत्यु झाला. दुसरीकडे राॅजर यांचे सध्याचे वय ८०वर्ष आहे.
२. गाय दे अल्विस- रासांजली शिल्वा ( Guy de Alwis & Rasanjali Silva,Sri Lanka )
श्रीलंकेकडून १९८३ ते १९८८ या काळात क्रिकेट खेळले. त्यांनी या काळात ११ कसोटी व ३१ वनडे सामने खेळले. फलंदाज असलेल्या अल्विस यांनी ११ कसोटीत ८च्या सरासरीने १५२ धावा तर वनडेत २१.१०च्या सरासरीने ४०१ धावा केल्या. त्यांनी सेन्दापेरुमा अर्चिगे रासांजली चामिंडा दे अल्विस या महिला क्रिकेटपटूशी लग्न केले.
गाय दे अल्विस यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९५९चा तर रासांजली शिल्वा यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९७१चा. रासांजली श्रीलंकेकडून १ कसोटी व २२ वनडे सामने खेळल्या. कसोटीत त्यांनी १३च्या सरासरीने २६ धावा व ७च्या सरासरीने ८ तर वनडेत १४च्या सरासरीने २५६ धावा व २३च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या. त्यांनी दोन विश्वचषकात श्रीलंकेकडून भाग घेतला. गाय दे अल्विस यांचा वयाच्या ५२व्या वर्षी २०१३मध्ये मृत्यु झाला.
१. मिचेल स्टार्क- एॅलिसा हेली ( Mitchell Starc & Alyssa Healy ,Australia)
ऑस्टेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क व महिला क्रिकेटपटू एॅलिसा हेलीने २०१६मध्ये लग्न केले. ३० वर्षीय मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून ५७ कसोटी, ९१ वनडे व ३१ टी२० सामने खेळला असून त्याने कसोटीत २४४, वनडेत १७८ तर टी२०मध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहे. तो तीनही प्रकारातील संघांचा पुर्णवेळ सदस्य आहे.
तर ३० वर्षीय एॅलिसा हेली ही इयान हेली यांचा पुतणी आहे. विकेटकिपर फलंदाज असलेली हेलीने ऑस्ट्रेलियाकडून २०११ ते २०१९ या काळात ४ कसोटी, ७३ वनडे व ११२ टी२० सामने खेळला असून त्याने कसोटीत २०१, वनडेत १६३८ तर टी२०मध्ये २०६० धावा केल्या आहे. ८ मार्च २०२० रोजी झालेल्या महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तिने ३९ चेंडूत ७५ धावांची तुफानी खेळी केली होती. विशेष म्हणजे हा सामना पाहायला मिचेल स्टार्क श्रीलंका दौरा अर्ध्यावर सोडून मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला आला होता. Which male cricketer is married to a female cricketer?
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु