आयपीएल 2019 चे सर्वांनाच वेध लागले आहेत. या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे. हा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे पार पडणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये 1003 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
त्यातील आता लिलावासाठी अंतिम 346 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 226 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच यातील 9 खेळाडूंच्या लिलावासाठी सर्वोच्च 2 कोटी ही मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. हे नऊही खेळाडू विदेशी आहेत. यात ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, कॉलिन इंग्राम, शॉन मार्श, कोरे अँडरसन, सॅम करन, अँजेलो मॅथ्यूज आणि डॉर्सी शॉर्ट या नऊ खळाडूंचा समावेश आहे.भारतीयांमध्ये जयदेव उनाडकटला सर्वाधिक 1.5 कोटी रुपये ही मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. त्याच्यासह अजून 9 विदेशी खेळाडूंचीही हीच मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. तर 19 खेळाडूंची 1 कोटी या मुळ किंमतीसाठी निवड झाली आहे. यात युवराज सिंग, वृद्धिमान सहा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल या चार भारतीयांचा समावेश आहे.तसेच आयपीएल 2019च्या लिलावासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये मुस्तफिकूर रहिम आणि मदमुल्लहा या दोन बांगलादेशच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच बांगलादेशच्या शाकिब अल हसनला सनरायजर्स हैद्राबादने कायम केले आहे.अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये 8 खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. तर अमेरिकेमधील मोहम्मद खानची निवड करण्यात आली आहे.यावर्षी आयपीएल लिलावात एक मोठा बदल दिसणार आहे तो म्हणजे, गेले 11 वर्षे आयपीएल लिलावात लिलावकर्ते म्हणून काम पाहणारे रिचर्ड मॅडली यावर्षी आयपीएल लिलावात नसणार आहेत. त्यांच्या ऐवजी लिलावकर्ता म्हणून ह्यूज एजमेड्स यांची निवड करण्यात आली आहे.या देशाच्या खेळाडूंची झाली आहे आयपीएल लिलावासाठी निवड-226 खेळाडू – भारत26 खेळाडू – दक्षिण आफ्रिका23 खेळाडू – आॅस्ट्रेलिया18 खेळाडू – विंडीज18 खेळाडू – इंग्लंड13 खेळाडू – न्यूझीलंड8 खेळाडू – अफगाणिस्तान7 खेळाडू – श्रीलंका2 खेळाडू – बांगलादेश2 खेळाडू – झिम्बाब्वे1 खेळाडू – अमेरिका1 खेळाडू – आयर्लंड1 खेळाडू – नेदरलँडमहत्त्वाच्या बातम्या:–केएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले–आयपीएलचे माजी अध्यक्ष ललीत मोदींच्या पत्नीचे निधन