---Advertisement---

‘मी फक्त २ मिनीटं स्टेजवर होतो, मला माफ करा’ क्रिकेटरने व्यक्त केली दिलगीरी

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 10:21 AM
---Advertisement---

क्रिकेटपटू शकिब अल हसनला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मंगळवारी बांगलादेश पोलिसांनी अटक केली. गेल्या गुरुवारी (10 नोव्हेंबर) शकीब अल हसन कोलकाता येथील बेळघाट परिसरातील काली माता पूजेला गेला होता आणि त्यानंतर शुक्रवारी तो विमानातून बांगलादेशला परतला होता.  हिंदू देवीच्या पूजेमध्ये सामील झाल्यानंतर शकीबला स्वत: ला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याने दिलगीरी व्यक्त केली आहे.

आरोपीला झाली अटक

पोलिस व गुन्हे विरोधी रॅपिड एक्शन बटालियनने संयुक्तपणे शाकिबला धमकी देणाऱ्या 28 वर्षीय मोहसिन तालुकदारला अटक केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तो आरोपी आता आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्याविरूद्ध कायदेशीर प्रक्रिया अवलंबिल्या जातील.

शकिबचा कार्यक्रमात घेतलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर मोहसिन तालुकदारने रविवारी रात्री फेसबुकवर स्वत: जिवे मारण्याची धमकी दिली आणि सांगितले की, क्रिकेटपटू पूजा कार्यक्रमात गेल्यामुळे त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी तालुकादारने ही धमकी मागे घेतली आणि दुसर्‍या  थेट व्हिडिओमध्ये माफी मागितली. चौकशीसाठी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सुनमगंज जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

धमक्या आल्यानंतर शकीबने व्यक्त केली दिलगीरी

तथापि, या कार्यक्रमात अल्पावधीसाठीच त्याचा सहभाग असल्याचे सांगून या क्रिकेटपटूने दिलगिरी व्यक्त केली आणि कालीपूजेचे उद्घाटन त्याने केले नाही, अशी माहिती त्याने दिली.

“त्या कार्यक्रमात मी दोन मिनिटे स्टेजवर होतो. लोक याबद्दल बोलत आहेत आणि समज करून घेत आहेत की मी त्याचे उद्घाटन केले आहे. मी हे केले नाही आणि एक जागरूक मुस्लिम म्हणून मी हे करणार नाही. पण कदाचित मी तिथे जायला नको होते. याबद्दल मी प्रत्येकाची दिलगिरी व्यक्त करतो.” असे शाकिब म्हणाला आहे.

तो पुढे म्हणाला, “एक मुस्लिम म्हणून मी नेहमीच धार्मिक प्रथा पाळण्याचा प्रयत्न करतो. कृपया मी काही चूक केली असेल तर मला माफ करा.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---