भारतीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण आणि यूसुफ पठाण यांनी त्यांच्या दमदार प्रदर्शनाने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. या दोन्ही पठान बंधूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक पराक्रम केले आहेत, ज्यांची आजही चर्चा होते. विशेष म्हणजे, इरफान आणि यूसुफच्या नावावर एका अशा विक्रमाची नोंद आहे, जो मोडणे खूप कठीण आहे.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफानने डिसेंबर २००३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, २००४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि २००६मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
२००७ सालच्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात इरफान बनला होता सामनावीर –
२००७मध्ये पहिल्यांदा टी२० विश्वचषक खेळला गेला होता. या विश्वचषकातील अंतिम सामना २४ सप्टेंबर २००७ रोजी जोहान्सबर्ग येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ धावांनी पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. यावेळी इरफानने अंतिम सामन्यात ४ षटके टाकत १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या दमदार गोलंदाजी प्रदर्शनाने भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याच्या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू यूसुफ पठाणने २००७ सालच्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. तर, जून २००८मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
आयपीएल २००८मध्ये अंतिम सामन्यात यूसुफ बनला होता सामनावीर –
२००८मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची सुरुवात झाली. यूसुफ आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. या हंगामात राजस्थान रॉयल्सने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. १ जून २००८ रोजी मुंबईमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात राजस्थानने ३ विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले होते.
राजस्थानच्या विजयात यूसुफने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ३९ चेंडूत ५६ धावांची अफलातून खेळी केली होती. सोबतच ४ षटके टाकत २२ धावा देत ३ विकेट्स घेण्याचाही कारनामा केला होता. त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अशाप्रकारे टी२० विश्वचषकाच्या आणि आयपीएलच्या पहिल्याच हंगामातील अंतिम सामन्यात सामनावीर बनण्याचा शानदार विक्रम पठाण बंधूंच्या नावावर नोंदला गेला आहे. Man Of The Match Award In Final Of First Season Of T20 World Cup And IPL
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
भारतीय क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा पीपीई किटमध्ये डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बेटा, तू पहिल्या बॉलवर तेंडूलकरला क्लिन बोल्ड केलंय, जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे तो
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ यष्टीरक्षक; एमएस धोनी आहे या स्थानी
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य






