---Advertisement---

‘माझे शतक नव्हे संघाचा विजय महत्त्वाचा,’ सामनावीर पडीक्कलच्या वक्तव्याने जिंकली सर्वांचे मने

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 9:48 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने सलामी फलंदाज देवदत्त पडीक्कलच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर दहा गडी राखून विजय मिळवला. आयपीएल 2021 मधील आरसीबीचा हा सलग चौथा विजय आहे. पडीक्कलने 52 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

या सामन्यानंतरच्या सादरीकरणात तो म्हणाला की, “खरे सांगायचे झाले तर ही खेळी माझ्यासाठी खूप खास खेळी होती. मी सतत माझ्या याच खेळीची वाट पाहत होतो. मागच्या काही सामन्यांमध्ये मी चांगली खेळी करण्यास अपयशी ठरलो. परंतु या सामन्यात मला चांगली सुरुवात मिळाली. या सामन्यात विराट कोहलीला मी आपल्या संघाचे जिंकणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही मोठे फटके खेळा. माझ्या शतकाचा विचार करू नका, असे म्हटले. या सामन्यात मी खूप मोठे फटके खेळलो परंतु एकेरी धाव घेणे पण महत्त्वाचे आहे.”

या सामन्याबाबत बोलायचे झाले तर, नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या राजस्थान संघाची सुरूवात खराब झाली. परंतु शिवम दुबेच्या 46 धावा आणि राहुल तेवातियाच्या 40 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून 177 धावा केल्या. यामध्ये आरसीबीकडून गोलंदाजी करत असलेल्या मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.

तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीतील देवदत्त पडीक्कलच्या नाबाद 101 आणि विराट कोहलीच्या नाबाद 72 धावांच्या खेळीमुळे 17 व्या षटकात एकही गडी न गमावता आरसीबीने दहा गडी राखून राजस्थानवर विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

जेंटलमन्स गेम! लाईव्ह सामन्यात जोस बटलरचं मनाला भावणारं कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच

शतकाजवळ पोहोचल्यानंतर पडीक्कलने कोहलीला म्हटले होते असे काही, वाचून करालं कौतुक

संघ-सहकाऱ्यासोबत धावांचे दीडशतक पार करण्यात कोहली माहीर, कोणालाही न जमलेल्या किर्तीमानाची केली नोंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---