---Advertisement---

संघ-सहकाऱ्यासोबत धावांचे दीडशतक पार करण्यात कोहली माहीर, कोणालाही न जमलेल्या किर्तीमानाची केली नोंद

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 8:54 AM
---Advertisement---

गुरुवारी (२२ एप्रिल) मुंबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा सोळावा सामना झाला. बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहलीने हा सामना गाजवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पडीक्कल आणि कोहलीने दीडशतकी भागिदारी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. यासह कोहलीच्या नावे आयपीएल इतिहासातील मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

राजस्थानच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ४७ चेंडूंचा सामना केला आणि ३ षटकार व ६ चौकार मारले. तर पडीक्कलने ५२ चेंडूत ६ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा चोपल्या.  अशाप्रकारे कोहली आणि पडीक्कलमध्ये पहिल्या विकेटसाठी १८१ धावांची भागिदारी झाली.

आयपीएल इतिहासात १५० पेक्षा जास्त धावांची भागिदारी करण्याची ही कोहलीची तब्बल सहावी वेळ होती. २००८ पासून आयपीएलचा भाग असलेल्या कोहलीने यापुर्वीही संघ सहकाऱ्यासोबत मिळून १५० पेक्षा जास्त भागिदारांची केली होती. यासह कोहली हा आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात सहा वेळा दीडशतकाहून अधिक धावांची भागिदारी करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.

याबरोबरच विराटने या सामन्यात आपले आयपीएल २०२१ मधील पहिलेवहिले अर्धशतक झळकावले आहे. ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत त्याने आयपीएलमधील ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये कोणालाही ६००० धावा करता आलेल्या नाहीत. विराटने १९६ व्या आयपीएल सामन्यात खेळताना हा कारनामा केला आहे. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचाही समावेश आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (२२ एप्रिलपर्यंत) विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ५४४८ धावांसह सुरेश रैना आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ५४२८ धावांसह शिखर धवन आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा आहेत. वॉर्नरने ५३८४ धावा केल्या आहेत. तर रोहितने ५३६८ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शतकाजवळ पोहोचल्यानंतर पडीक्कलने कोहलीला म्हटले होते असे काही, वाचून करालं कौतुक

बाबा नंबर १! अर्धशतक झळकावल्यानंतर विराटचं मन जिंकणारं सेलिब्रेशन, लाडक्या लेकीला केलं समर्पित 

सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---