---Advertisement---

फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता ‘मॅन ऑफ द मॅच’, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव

On: बुधवार, जुलै 27, 2022 12:28 PM
---Advertisement---

१९९३-९४मध्ये बंगाल क्रिकेट संघटनेच्या सिल्व्हर जुबली वर्षामुळे भारतात हिरो कपचे आयोजन करण्यात आले होते. यातील ४ था वनडे सामना मुंबईतील ब्रेबाॅन स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात झाला.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. सामना ४० षटकांचाच झाल्यामुळे निर्धारित ४० षटकांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ५ बाद १८० धावा केल्या. यात डॅरेन कुलीनने आफ्रिकेकडून ७० तर जॉन्टी रोड्सने ४० धावा केल्या.

त्यानंतर १८१ धावांचे लक्ष मैदानात घेऊन आलेल्या वेस्ट इंडिज संघाने ३७ षटकांत सर्वबाद १३९ धावांपर्यंतच मजल मारली व ४१ धावांनी पराभव स्विकारला. दक्षिण आफ्रिकेकडून ५ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या परंतु जॉन्टी रोड्स या अलविलिया क्षेत्ररक्षकाने तब्बल ५ झेल घेतले होते.

१४ नोव्हेंबर १९९३ रोजी झालेला हा विक्रम आजही कोणताही क्षेत्ररक्षक मोडू शकलेला नाही. जगात अनेक खेळाडूंनी वनडे सामन्यात ४ झेल घेतले आहेत परंतु कुणालाही ५ झेल घेता आलेले  नाही. यावेळी हवेत सुर मारत, ड्राईव्ह करत, डाव्या बाजूला हवेत झेपावत अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याने हे झेल घेतले. यानंतर त्याला या सामन्यासाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. क्षेत्ररक्षकांना त्यापुर्वी सामनावीर म्हणून क्रिकेटमध्ये पुरस्कार देण्यात आला होता व नंतरही देण्यात आले परंतु रोड्सने केलेला हा कारनामा अद्भुत होता. Man of the Match for fielding.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, इंडियाकडे आयसीसीच्या ‘या’ स्पर्धेचे यजमानपद

“हुड्डा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरतोय”

मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---