नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ला नवीन विजेता संघ मिळाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ७ विकेट्सने बाजी मारली आणि पहिल्यांदा आयपीएल चषक उंचावला. असे असले, तरी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने गोलंदाजीसह जबरदस्त फटकेबाजीही केली. त्यामुळे त्याने सामनावीर पुरस्कारावरही आपले नाव कोरले. यासह तो एका विशेष क्लबमध्ये दाखल झाला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथील मैदानावर रंगलेल्या गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यातील अंतिम सामन्यात राजस्थान प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. त्यांनी यावेळी ९ विकेट्स गमावत १३० धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने महत्त्वपूर्ण खेळी केली. ३० चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ३४ धावा चोपल्या. या दमदार खेळीच्या बळावर गुजरातला हे आव्हान पार करण्यात यश मिळाले.
अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात ३४ धावांची खेळी करणाऱ्या पंड्याला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह तो आयपीएलच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरणाऱ्या खेळाडूंच्या खास यादीत सहभागी झाला आहे.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ बनलेले क्रिकेटपटू
२००८- युसूफ पठाण
२००९- अनिल कुंबळे
२०१०- सुरेश रैना
२०११- मुरली विजय
२०१२- मनविंदर बिस्ला
२०१३- कायरन पोलार्ड
२०१४- मनिष पांडे
२०१५- रोहित शर्मा
२०१६- बेन कटिंग
२०१७- कृणाल पंड्या
२०१८- शेन वॉटसन
२०१९- जसप्रीत बुमराह
२०२०- ट्रेंट बोल्ट
२०२१- फाफ डू प्लेसिस
२०२२- हार्दिक पंड्या*
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम