इंग्लंड क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा विजेता ठरला. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत जोरदार फटकेबाजी केली आणि 5 विकेट्सने विजय साकारला. हा इंग्लंडचा दुसरा टी20 विश्वचषक विजय होता. इंग्लंडच्या विजयात सर्वात मोठे योगदान सॅम करन आणि बेन स्टोक्स यांनी दिले. इंग्लंडकडून करनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तर स्टोक्सनेही सर्वाधिक धावा केल्या. मात्र, करनच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हे झालं या विश्वचषकाचं, पण यापूर्वीच्या टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात कुणाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते? चला जाणून घेऊया…
सॅम करन सामनावीर
पाकिस्तान संघाकडून या सामन्यात एकाही फलंदाजाला शानदार फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावाच करता आल्या. यावेळी पाकिस्तानची फलंदाजी खिळखिळी करण्याचे काम इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन (Sam Curran) याने केले. करनने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान, शान मसूद आणि मोहम्मद नवाझ या फलंदाजांची विकेट घेतली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Sam Curran, Player of the Tournament. ❤️
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
Player of the #T20WorldCupFinal 💪
13 wickets at an average of 11.38 in the tournament 🤩
Sam Curran is the Player of the Tournament for his stellar performances 😍#T20WorldCup pic.twitter.com/LD2xHaA5UL
— ICC (@ICC) November 13, 2022
टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेले खेळाडू
सन 2007च्या पहिल्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इरफान पठाण याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यानंतरच्या 2009च्या टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा तत्कालिन कर्णधार शाहिद आफ्रिदी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. पुढे 2010मध्ये क्रेग कीस्वेटर, 2012मध्ये मार्लोन सॅम्युअल्स, 2014मध्ये कुमार संगकारा, 2016मध्ये मार्लोन सॅम्युअल्स आणि 2021मध्ये मिचेल मार्श यांना टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उत्तम कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. (Man of the Match in T20 World Cup Final sam curran name added in the list)
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू
2007- इरफान पठाण
2009- शाहिद आफ्रिदी
2010- क्रेग कीस्वेटर
2012- मार्लोन सॅम्युअल्स
2014- कुमार संगकारा
2016- मार्लोन सॅम्युअल्स
2021- मिचेल मार्श
2022- सॅम करन*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके
सेमीफायलमधून बाहेर पडूनही भारत ‘या’ यादीत दुसऱ्या स्थानी, इंग्लंडने ट्रॉफी जिंकून पटकावला तिसरा क्रमांक