मँचेस्टर सिटीने गेल्या हंगामात इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले. गुणतालिकेत ८७ गूण मिळवत ५ सामने शिल्लक असतानाच त्यांनी आपले विजेतेपद निश्चित केले होते.
प्रशिक्षक पेप गार्डीओला यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबने नक्की काय केले ज्यामुळे ते विजेतेपदापर्यंत पोहोचले?? हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे आणि त्याचे उत्तर सगळ्यांना १७ ऑगस्टला मिळेल.
स्पेन आणि जर्मनीमध्ये यशस्वी झालेल्या मॅनेजर पेपला प्रिमियर लीगमध्ये यश मिळणार नाही अश्या चर्चांना पुर्णविराम लावत मॅन्चेस्टर सिटीने यश प्राप्त केले आणि फक्त लीग जिंकली नाही तर त्याच लीगमधील अनेक विक्रम मोडले.
याच विजेतेपदाचा प्रवास खेळाडूंचे प्रशिक्षण, मॅनेजर पेपयांच्या काम करण्याच्या पद्धती, ड्रेसिंग रुममधील चर्चा असे सगळे मॅन्चेस्टर सिटीने दाखवायचे ठरवले आहे आणि हे सर्व ॲमेझाॅन प्राईमवर १७ ऑगस्टपासून पहायला मिळेल.
ऑल ऑर नथिंग (all or nothing) असे या मालिकेचे नाव असेल आणि त्याचे एकूण ८ भाग प्रकाशित होतील.
"We have to fight for everything that we are…"
All or Nothing: Manchester City. Coming to @primevideo 17 August #mancity pic.twitter.com/hZiHoFuRAr
— Manchester City (@ManCity) July 23, 2018
यातच सिटीचा एफए कपमध्ये झालेला पराभव त्यांचा विक्रमी सलग सामन्यातील विजय, सर्वाधीक गोल्स, सर्वाधीक गुण असे अनेक विक्रम अधोरेखित केले जातील.
यात खेळाडूंच्या मुलाखतीसुद्धा दाखवणार आहेत.
मॅन्चेस्टर सिटीने एकाच हंगामात १०० गुण मिळवत केलेल्या विक्रमानंतरसुद्धा १०० विक्रमांचे ट्वीट सिटीने केले होते. त्यानंतर येणारी ही मालिका त्यांच्या समर्थकांसाठी एक पर्वणी असेल.
100 points ????
100 tweets ????
100 reasons to smile ????Share your favourite #mancity memory from last season and it could get featured in the City100 thread!
1. Magnifico! @aguerosergiokun became our all-time record goalscorer with his strike in Napoli. pic.twitter.com/4W9s9hdb8K
— Manchester City (@ManCity) June 11, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
–ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर








