स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅंचेस्टर युनायटेड वेगवेगळे झाले आहेत. युनायटेडने रोनाल्डोला क्लबमधून मुक्त केल्याचे निवदेनही जाहीर केले आहे. क्लबने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून मंगळवारी (22 नोव्हेंबर) याची माहिती दिली. दोघांच्या संमतीमुळेच करार संपुष्टात आल्याचे समोर पुढे येत आहे. त्याचबरोबर क्लबने रोनाल्डोला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.
इंग्लिश प्रीमियर क्लब मॅंचेस्टर युनायटेडने (Manchester United) जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले, ‘क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने, तात्काळ प्रभावाने सोडणार आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीत दोन वेळा दिलेल्या योगदानाबद्दल क्लब त्याचे आभार मानते. त्याने 346 सामन्यांमध्ये 145 गोल केले. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅग याच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि खेळपट्टीवर यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो.’
रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी पियर्स मॉर्गन यांना एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने क्बलविषयी आणि तेथील अधिकाऱ्यांविषयी विधाने केली, ज्यामुळे दोघांमधील संबंध फारच बिघडले.
रोनाल्डोने मॉर्गनला दिलेल्या या मुलाखतीत सांगितले की, “ऍलेक्स फर्ग्युसन गेल्यानंतर क्लबची प्रगती झालेली नाही. मॅनेजर एरिक टॅन हॅग याच्याबाबत माझ्या मनात आदर नाही, कारण तो ही मला आदर सन्मान देत नाही. जर तुम्ही मला सन्मान देत नसाल तर मग मी पण का देऊ.”
या मुलाखतील रोनाल्डोने पुढे विचारण्यात आले की, युनायटेड क्लबचे काही अधिकारी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत का? यावर तो म्हणाला, “हो, मला तशी जाणीव होत आहे की क्लबमधील तीन ते चार अधिकारी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून मला धोका देत असल्याची जाणीव होत आहे.”
https://twitter.com/ManUtd/status/1595107357159297029?s=20&t=7Q3O9_rcYVf1oObg1LZxpg
रोनाल्डोला 2021मध्ये युनायटेडने क्लबमध्ये घेतले होते. दोघांमध्ये 216 कोटी रुपयांचा व्यवहारदेखील झाला होता. त्याआधी रोनाल्डो इटलीच्या युवेंट्स क्लबसोबत होता. तसेच तो 2003-09 दरम्यान देखील युनायटेडकडून खेळला आहे. सध्या तो कतार येते सुरू असलेल्या विश्वचषकात पोर्तुगलकडून खेळण्यात व्यस्त आहे. Manchester United Release Cristiano Ronaldo on Mutual agreement
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रीप
युझवेंद्र चहलला ग्लेन फिलिप्सने मारलेला षटकार व्हायरल, स्टेडियमच्या छतावर पोहोचवला चेंडू






