---Advertisement---

अन् मनदीप सिंग उतरला दक्षिण आफ्रिकेकडून क्षेत्ररक्षणासाठी तेही टीम इंडियाविरुद्ध, ‘हे’ होते कारण

---Advertisement---

गल्ली क्रिकेट खेळताना अनेकांना एक अनुभव नक्की आला असेल, जर प्रतिस्पर्धी संघाला एखादा खेळाडू कमी पडत असले तर समोरच्या संघातील खेळाडू त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण करतो. पण ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्थरावरही झाली आहे. असे जर कोणाला सांगितले तर कोणाला विश्वास पटकन बसणार नाही. पण असे झाले आहे. तेही भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत २ वेळा. एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबतीत आणि दुसऱ्यांदा मनदीप सिंगबाबत.

सचिन वयाच्या १३ व्या वर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर एका सराव सामन्यात २० जानेवारी १९८७ साली पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनंतर मनदीप सिंगलाही अशीच गोष्ट करावी लागली होती. त्याचबद्दल या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अन् मनदीप सिंग उतरला दक्षिण आफ्रिकेकडून क्षेत्ररक्षणासाठी 

साल २०१५ मध्ये भारतात भारत अ, ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघात तिरंगी मालिका सुरु होती. या मालिकेतील चेन्नई येथे झालेल्या भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघातील सामन्यादरम्यान आणि सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचे तब्बल १० खेळाडूंना उष्णता आणि अन्नातून विषबाधा झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यामुळे या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने चक्क आपल्या संघाचा व्हिडिओ ऍनालिस्ट हेंड्रिक्स कोएर्टजनला एका खेळाडूच्या जागी बदली क्षेत्ररक्षक म्हणून उभे केले होते. पण त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डिकॉकलाही क्षेत्ररक्षणादरम्यान पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मैदानाबाहेर जावे लागले. त्यापूर्वी त्याने फलंदाजी करताना १०८ धावांची खेळी केली होती. पण तो क्षेत्ररक्षणावेळी बाहेर गेल्याने दक्षिण आफ्रिकेकडे बदली क्षेत्ररक्षक म्हणून कोणीही उरले नव्हते.

त्यामुळे मनदीप दक्षिण आफ्रिकेची जर्सी घालून त्यांच्या संघासाठी बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. विशेष म्हणजे उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघातील तो १२ वा खेळाडू होता. मनदीप एडी ली (Eddie Leie) नावाची जर्सी घालून मैदानात उतरला होता.

https://twitter.com/BrokenCricket/status/630367778516545536

या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतलेल्या भारतीय संघाकडून मयंक अगरवालने १३० धावांची खेळी केली होती. तर उन्मुक्त चंदने ९० धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताने हा सामना ३८ व्या षटकातच ८ विकेट्सने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंड दौर्‍यावर एकाच विमानाने जाणार भारताचे पुरुष आणि महिला संघ, पण बीसीसीआय करणार ‘हा’ भेदभाव

Video: रॉबिन उथप्पाचे पत्नी शितलसह थिरकले पाय; ऋतुराज गायकवाडने दिले ‘इतके’ गुण

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरताच भारतीय संघ बदलणार ८९ वर्ष जुना इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---