---Advertisement---

LLC 2023 । मणिपाल टायगर्सने पहिल्यांदा जिंकली ट्रॉफी, हरभजनकडून रैनाच्या संघाला फायनलमध्ये मात

On: रविवार, डिसेंबर 10, 2023 4:20 PM
Manipal Tigers
---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकटे 2024 मध्ये हरभजन सिंग यांच्या नेतृत्वातील मणिपाल टायगर्स संघाने विजेतेपद पटकावले, रविवारी (9 डिसेंबर) या लीगचा अंतिम सामना अर्बनरायजर्स हैदराबाद आणि मणिपाल टायगर्स यांच्यात खेळला गेला. हरभजनच्या नेतृत्वातील मणिपाल संघाने सुरेश रैना याच्या हैदराबादला 5 विकेट्सने धूळ चारली. मणिपालसाठी हे एलएलसीचे पहिलेच विजेतेपद ठरले.

मणिपाल टायगर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अर्बनरायजर्स हैदराबाद संघ 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 187 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात मणिपाल टायगर्सने 19 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 193 धावांपर्यंत मजल मारली आणि विजय मिळवला. असाला गुणरत्ने याने केलेल्या अर्धशतकासाठी (51*) त्याला सलामीवीर पुरस्कार दिला गेला.

प्रथम फलंदाजीला आल्यानंतर हैदराबादसाठी रिक्की क्लार्क (80) आणि गुरकीरत सिंग मान (64) यांनी अर्दशतके केले. प्रत्युत्तरात मणिपालसाठी सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पा याने 40 धावांची अप्रतिम खेळी केली. असाला गुणरत्ने याने हैदराबादसाठी 51 धावांची सर्वोत्तम खेळी केली.

तत्पूर्वी मणिपाल टायगर्स संघ पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्बनरायजर्स हैदराबादकडून पराभूत झाला होता. एलिमिनेटर सामना जिंकून आलेल्या इंडिया कॅपिटल्स संघाला स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मणिपालने 6 विकेट्सने मात दिली. अशा प्रकारे पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात जिंकलेला अर्बनरायजर्स हैदराबाद आणि दुसरा उपांत्यपूर्ण सामना जिंकणारा मणिपाल संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले. मणिपालसाठी हे एलएलसीमधील पहिले विजेतेपद आहे. (Manipal Tigers beat UrbanRisers Hyderabad by 5 wickets in the LLC final)

महत्वाच्या बातम्या – 
विजय मिळवूनही निराश झाला कीवी कर्णधार; म्हणाला, ‘माझ्या करिअरमधली सर्वात खराब…’
INDvsSA: पहिल्या टी20त कोण करणार Opening? कॅप्टन सूर्या म्हणाला, ‘निर्णय तर कधीच झालाय…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---