सध्या भारतातील विविध शहरांमध्ये सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी प्रथमश्रेणी स्पर्धा रणजी ट्रॉफी खेळली जातेय. रणजी ट्रॉफी 2022-2023 च्या या हंगामात कर्नाटक संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला अनुभवी फलंदाज मनीष पांडे हा या स्पर्धेत आपला 100 वा प्रथमश्रेणी सामना खेळतोय. हा महत्त्वाचा सामना मनीषने संस्मरणीय करत द्विशतक साजरे केले.
मनीष पांडे हा मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघा बाहेर आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने खेळताना दिसतो. कर्नाटक संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या पांडेने गोव्याविरुद्ध रणजी ट्रॉफी हंगामातील दुसऱ्या फेरीचा सामन्यात आपले 100 प्रथमश्रेणी सामने पूर्ण केले.
कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मनीष पांडे याने सार्थ ठरवला. कारकिर्दीतील हा मैलाचा दगड पार करताना त्याने 186 चेंडूवर 14 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने 208 धावा केल्या. त्यामुळे कर्नाटक संघाने आपला पहिला डाव 603 धावांवर घोषित केला.
कर्नाटकसाठी 2008 मध्ये मनिषने आपल्या याच खेळी दरम्यान प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे त्याने तब्बल 12 डावानंतर अर्धशतकाच्या पुढे मजल मारली होती.
मनीष याच्या या खेळीची तुलना अनेक जण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या खेळीशी करताना दिसत आहेत. कारण, दोन दिवसांपूर्वीच वॉर्नरने आपल्या 100 व्या कसोटीत 200 धावांची खेळी केली होती.
(Manish Pandey Hits Double Century In His 100 FC Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केनने दिला पाकिस्तानला पेन! 722 दिवसांनी शतक ठोकत न्यूझीलंडला मिळवून दिली आघाडी
श्रेयसला पुढील कसोटी कर्णधार करण्यासाठी भारतीय दिग्गज आग्रही; म्हणाला, “सध्यातरी तोच…”