आपला पहिलाच सामना अविस्मरणीय रहावा अशी प्रत्येक खेळाडूंची मनोमन इच्छा असते. कसोटी, वनडे किंवा टी२०त पहिल्याच सामन्याचा दबाव असतानाही धडाकेबाज कामगिरी करुन सर्वांच लक्ष वेधून घेण्याची खेळाडूंची इच्छा असते. क्रिकेटपटूसांठी पहिला सामना नेहमीच अविस्मरणीय असतो. म्हणूनच पदार्पणाच्या सामन्यात अनन्यसाधारण महत्त्व असते.
अनेक क्रिकेटपटू पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरी करत विक्रमही करतात. असाच एक विक्रम भारताचा क्रिकेटपटू मनिष पांडेने केला आहे. पांडेने त्याच्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय क्रिकेटपटूला त्यांच्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० अशा दोन्ही पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारता आलेला नाही.
मनिषने १४ जूलै २०१५ ला झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे वनडे पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने ८६ चेंडूत ७१ धावांची खेळी करताना ४ चौकार आणि १ षटकार मारला होता.
तसेच त्याने वनडे पदार्पणानंतर ३ दिवसांनी १७ जूलै २०१५ ला हरारे येथेच झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १९ चेंडूत १९ धावा करताना १ चौकार आणि १ षटकार मारला होता.
मधल्या फळीतील फलंदाज मनिषने आत्तापर्यंत २६ वनडे आणि ३८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३५.१४ च्या सरासरीने ४९२ धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने ४७.१३ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह ७०७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
इंग्लंडला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने ‘या’तगड्या गोलंदाजाला थेट पाकिस्तानातून घेतले बोलावून
दुर्दैवचं म्हणा! या खेळाडूंच्या नशिबात कधीही आला नाही आयसीसीच्या स्पर्धेतील सामनावीर पुरस्कार
एकाच कसोटीत एकाच संघाकडून खेळले ४ वेगळे ओपनर, मोडला ३६ वर्ष जुना विक्रम