रविवारी (४ सप्टेंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा १७वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात २०८ धावा केल्या. दरम्यान हैदराबादचा खेळाडू मनिष पांडेने क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम झेल पकडला.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करण्यासाठी रोहित आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक मैदानावर उतरले. मात्र पहिल्या षटकातच रोहित केवळ ६ धावा करत पव्हेलियनला परतला. त्यामुळे संघाला मोठा झटका बसला. पण पुढे डी कॉक आणि सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सांभाळला. पण १८ चेंडूंवर २७ धावा करत सूर्यकुमारही बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी इशान किशन आला.
या धुरंधरने अधिकाधिक धावा करण्याच्या उद्देशाने दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि २३ चेंडूत १३४.७८च्या स्ट्राईक रेटने ३१ धावा कुटल्या. पण डावातील १५व्या षटकातील शेवटचा चेंडू त्याच्यासाठी अनलकी ठरला. संदीप शर्माच्या त्या चेंडूवर इशानने लाँग ऑनवरुन दमदार शॉट मारला. पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या मनिष पांडेने वेगाने डाइव्ह घेत चेंडू पकडला. परिणामत: इशान झेलबाद झाला.
https://twitter.com/edgbaston_149/status/1312714805522755585?s=20
https://twitter.com/Cric_life59/status/1312715282406756353?s=20
https://twitter.com/ChanduThEBraNd/status/1312715771772981253?s=20
https://twitter.com/RahulRyon/status/1312715208956145666?s=20
https://twitter.com/theri_ponnu/status/1312715416578424832?s=20
What a catch by Manish Pandey, one of the all-time best in IPL. pic.twitter.com/pmgxICZs1t
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2020
What a catch from Manish Pandey. So athletic and brilliant!! #IPL2020 pic.twitter.com/kv8eIafXp1
— rea (@reaadubey) October 4, 2020
Manish Pandey did look that catch easy yeah..#MIvSRH pic.twitter.com/XmqS2dIl2L
— JAMES (@ImJames_) October 4, 2020
🚩🚩🚩 Manish Pandey 🚩🚩🚩
What a catch..What a player… What an athlete…!!! The most Underrated Young Indian cricketer. ❤❤
He is one of the best fielder in Cricket. Internationally. 🙏🏻#SRHvsMI pic.twitter.com/BMoHJDcK6j— स्वप्नील. (@swwapnillll) October 4, 2020
पांडेचा हा अनोखा आणि अप्रितम झेल पाहून हैराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर भलताच खूश झाला. एवढेच नव्हे तर, पांडेच्या त्या शानदार झेलने चाहत्यांची मनेही जिंकली. त्यामुळे कित्येक चाहत्यांनी सोशल मीडियावर पांडेच्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याचे मनभरून कौतुक केले आहे. एका चाहत्याने तर पांडेच्या डाइव्हला ‘स्विमिंग पूल डाइव्ह’ असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर
नको रे बाबा! ‘कोलकाता संघातील खेळाडूंसोबत फलंदाजी करणे…’ मॉर्गनने दिली प्रतिक्रिया
दिनेश कार्तिकने मॉर्गन, रसेलच्या नंतर फलंदाजी करावी, पाहा कोणी दिला सल्ला
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
आरसीबीचे ५ महारथी, ज्यांनी आयपीएलच्या हंगामातील पहिल्या ४ डावात कुटल्यात सर्वाधिक धावा