बंगळूरु। बुधवारी, 29 आॅगस्टला भारत ब विरुद्ध आॅस्ट्रेलिया अ संघात चौरंगी मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेटने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही जिंकले.
या सामन्यात भारत ब संघाचा कर्णधार मनिष पांडेने नाबाद अर्धशतक करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पांडेबरोबरच या सामन्यात मयंक अगरवाल आणि शुभमन गिलनेही अर्धशतकी खेळी केली.
पांडेने या सामन्यात 54 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. याबरोबरच त्याने या मालिकेत एकदाही बाद न होता 306 धावा केरण्याचा पराक्रमही केला आहे.
तसेच तो या मालिकेतील सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने 76.5 च्या सरासरीने 1 शतक आणि दोन अर्धशतकांच्या सहाय्याने या धावा केल्या आहेत.
त्याने या मालिकेत आंतिम सामन्याआधी दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 95, भारत अ विरुद्धच्या सामन्यात नाबाद 21 आणि आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध नाबाद 117 धावा केल्या होत्या.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याने 15 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी तसेच पुढील वर्षी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मोठ्या स्पर्धांसाठी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तसेच त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघात मधल्या फळीसाठीचा फलंदाज म्हणून निवड समीतीसमोर त्याचा भक्कम पर्याय असेल.
तो भारताकडून जून महिन्यात झालेल्या आयर्लंड दौऱ्यातील टी20 मालिकेत खेळला होता. त्यात तो पहिल्या सामन्यात 0 वर नाबाद राहिला तर दुसऱ्या सामन्यात 21 धावांवर नाबाद राहिला.
तसेच त्याची इंग्लंड दौऱ्यातील टी20 मालिकेतही भारतीय संघात निवड झाली होती परंतू त्याला 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते.
पांडेने त्याचा शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळला होता.
त्याचबरोबर त्याने 2016 ला आॅस्ट्रलियातही भारत अ संघाकडून खेळताना 7 डावात 359 धावा केल्या होत्या. तर 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याने 5 डावात 307 धावा केल्या होत्या.
या दोन्ही मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच त्याने या मालिकेतही कर्णधारपद सांभाळताना विजेतेपद मिळवले होते.
भारत ब संघाने जिंकले चौरंगी मालिकेचे विजेतेपद-
बुधवारी पार पडलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाने भारत ब संघासमोर विजयासाठी 226 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना पांडेने गिलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 120 धावांची भागिदारी रचली. गिलने या सामन्यात 84 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 धावा केल्या.
तर सलामीवीर मयंक अगरवालने 67 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने 13 धावांवर असताना मैदानाबाहेर गेला. भारताने हे आव्हान 36.3 षटकात पूर्ण केले.
तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियाचा डाव षटकातच 225 धावांवर संपुष्टात आणला होता. भारताकडून श्रेयश गोपाळने 3, दिपक हुडा, नवदीप सैनी आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी 2 आणि जलज सक्सेनाने 1 विकेट घेतली.
आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्ट आणि अॅलेक्स कारेने अर्धशतक केले. शॉर्टने 77 चेंडूत 72 धावा आणि कारेने 56 चेंडूत 53 धावा केल्या.
Captain @im_manishpandey seals the deal with a SIX as India B beat Australia A by 9 wickets to lift the #QuadrangularSeries 🏆.
Details – https://t.co/IQalGoXQcT pic.twitter.com/jPeOajzXT5
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 29, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
– एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक
– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!
–भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…