प्रो कबड्डी लीगतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रविवारी (११ ऑक्टोबर) अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर चर्चा केली.
याबरोबरच प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात मनजीतने आपली कबड्डीची ड्रीम टीमही सांगितली. त्याने त्याच्या ड्रीम टीममध्ये स्वत:लाही स्थान दिले असून कव्हरसाठी स्वत:ची निवड त्याने केली आहे.
अशी आहे मनजीतची ड्रीम टीम
जोगिंदर नरवाल – लेफ्ट कॉर्नर
रविंद्र पेहेल – राईट कॉर्नर
सुरजीत सिंग – कव्हर
मनजीत चिल्लर – कव्हर
पवन कुमार – रेडर
विकास खंडोला- रेडर
परदीप नरवाल – रेडर
मनजीतने भारताकडून २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तो २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग राहिला आहे. त्याला अर्जून पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत ४ संघांचे प्रतिनिधित्व केले असून १०८ सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ५६३ गुण मिळवले आहेत. प्रो कबड्डीत सर्वाधिक ३३९ टॅकल पॉईंट्स आणि सर्वाधिक ३२४ यशस्वी टॅकलचा विक्रम मनजीतच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनानंतर कबड्डीचं होतंय पुनरागमन; ‘या’ राज्यात खेळवली जाणार स्पर्धा
ऐकावं ते नवलंच! त्याचा जर्सी क्रमांकच आहे त्याच्या घराचं नाव
सिनियर असूनही अजय ठाकूर राहुल चौधरीकडून शिकणार ‘ही’ गोष्ट
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज