भारताचा उजव्या हाताचा फलंदाज मनोज तिवारीने म्हटले आहे की, त्याने आतापर्यंत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला असा प्रश्न विचारलेला नाही की त्याने शतक केल्यानंतरही त्याला भारतीय संघातून बाहेर का काढून टाकण्यात आले होते.
तिवारीने फॅनकोड ऍपवर दिलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला आहे. Manoj Tiwari did not ask yet to ms dhoni why he was dropped from indias playing xi.
तिवारी म्हणाला की, “मी कधीही विचार केला नव्हता की देशासाठी शतक केल्यानंतर आणि सामनावीर बनल्यानंतरही मला १४ सामन्यांसाठी संघातील ११ जणांमध्ये स्थान दिले जाणार नाही. असे असले तरी, संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनी काही ना काही विचार केला असणार किंवा त्यांचे निश्चितच काही वेगळे नियोजन असणार.”
“त्यावेळी कधीही माझी हिंमत नाही झाली की मी धोनीला यामागचे कारण विचारावे. यामागील कारण हे होते की आम्ही आमच्या वरिष्ठांचा (सिनियर) आदर करतो आणि त्यांना उलट प्रश्न विचारत नाही. म्हणून मी आजपर्यंत त्याला या संदर्भात कधीही काही विचारले नाही.”
आयपीएलमध्ये तिवारी बऱ्याच संघाचा भाग होता. मात्र, २०१७मध्ये त्याला राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये असताना धोनीसोबत खेळण्याची संधी मिळाली होती. त्या संपूर्ण हंगामात तिवारीने दमदार प्रदर्शन केले होते. संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यासाठी तिवारीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरी त्याला २०१८मध्ये त्याला कोणत्याही संघात स्थान न मिळाल्यामुळे तेव्हापासून तो आयपीएलमधून बाहेर आहे.
तिवारीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत १२ वनडे सामन्यात २८७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा समावेश आहे. तर ३ टी२० सामन्यात त्याने १५ धावा केल्या आहेत. शिवाय २०१२मध्ये त्याने वनडेत ६१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याच्या वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने त्याचा शेवटचा सामना २०१५मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज
तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा
गरीबीमुळे एकवेळ फक्त मॅगी हेच अन्न होते, आज आहे मुंबई इंडियन्सचा…