fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज

May 14, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

क्रिकेटमध्ये सर्वात वाईट प्रकारे बाद होणे म्हणजे काय असेल तर धावबाद होणे. कारण अन्य प्रकारे फलंदाज बाद होताना सर्वच गोष्टी फलंदाजाच्या हातात नसतात. परंतु धावबाद होताना पुर्णपणे खेळपट्टीवर असलेल्या दोन फलंदाजांच्या हातात अनेक गोष्टी असतात.

अश्या विक्रमाचे जेव्हाही कुणी चर्चा करत असते तेव्हा इंझमान उल हक किंवा राहुल द्रविड यांचे नाव या विक्रमात घेतले जाते. परंतु सत्यपरिस्थिती थोडी वेगळीच म्हणावी लागेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड (५३) पहिल्या तर इंझमाम उल हक (४६) पाचव्या स्थानावर आहे. परंतु आपल्या पार्टनर खेळाडूला धावबाद होताना खेळपट्टीवर असणारे खेळाडू मात्र वेगळेच आहेत.

स्टिव वाॅ आहे सर्वात पुढे-

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टिव वाॅने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १०४ वेळा एकतर स्वत: किंवा पार्टनर फलंदाजाला धावबाद केले आहे. यात तो स्वत: ३१ तर त्याचे पार्टनर फलंदाज ७३ वेळा धावबाद झाला आहे. स्टिव वाॅने या १०४ पैकी २७ वेळा कसोटीत तर ७७ वेळा वनडेत एकतर स्वत: किंवा पार्टनर फलंदाजाला धावबाद केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पार्टनरला बाद करण्यात चंद्रपाॅल- सचिन आघाडीवर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टिव वाॅनंतर कुणासोबत सर्वाधिक फलंदाज धावबाद झाले असतील तर ते खेळाडू आहेत शिवनारायण चंद्रपाॅल व सचिन तेंडुलकर.

२२ वेळा शिवनारायण चंद्रपाॅल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावबाद झाला असून त्याचा पार्टनर फलंदाज तब्बल ५६ वेळा धावबाद झाला आहे. तर सचिन तेंडूलकर ४३ वेळा धावबाद झाला असून त्याचा पार्टनर ५५ वेळा धावबाद झाला आहे.

राहुल द्रविडही नाही मागे- 

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या राहुल द्रविडनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १०१ वेळा एकतर स्वत: किंवा पार्टनर फलंदाजाला धावबाद केले आहे. यातील चांगली गोष्ट अशी की राहुल स्वत: ५३ वेळा तर पार्टनर फलंदाज ४८ वेळा धावबाद झाला आहे.

वनडेत मात्र मोहम्मद युसूफ सर्वात पुढे-

पाकिस्तानचा माजी महान फलंदाज मोहम्मद युसूफने तब्बल ७९ वेळा वनडेत एकतर स्वत: किंवा पार्टनर फलंदाजाला धावबाद केले आहे. यात तो स्वत: ३८ तर पार्टनर फलंदाज ४१ वेळा धावबाद झाला आहे. वनडेत स्टिव वाॅने आपल्या पार्टनर फलंदाजाला ५०वेळा बाद केले असून तो स्वत: २३ वेळा बाद झाला आहे.

गांगुली द्रविड जोडी म्हटलं की धावबाद होणारचं

राहुल द्रविड व सौरव गांगुली या भारताच्या माजी कर्णधारांनी तब्बल १५६ वेळा भागीदारी केल्या. परंतु यातील १९ वेळा त्यांची भागीदारी तुटण्याचे कारण एका फलंदाजाचे धावबाद होणे ठरले. जवळपास त्यांच्या भागीदारी १२.१७ टक्के वेळा धावबादमुळे संपुष्टात आल्यात.

मॅक्क्युलम व मार्टिन गप्टिलची जोडी जगात भारी-

तब्बल १२३ वेळा भागीदारी केलेली मार्टिन गप्टिल व ब्रेंडन मॅक्क्युलम जोडी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारी रचताना धावबाद झाले नाहीत. भारताकडून सुरेश रैना व विराट कोहली जोडीने ६७ भागीदारी करताना कधीही धावबाद होतं भागीदारी संपुष्टात आणली नाही.

कपिल देव धावबादपासून ४ हात दूरच

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंबरोबर  २७० भागीदारी केल्या. परंतु कधीही ते धावबाद झाले नाहीत. १०० कसोटी सामने खेळून कधीही धावबाद न होणारा कपिल जगातील एकमेव खेळाडू आहे. Kapil Dev is the only player to have played over 100 Tests without being run out.

ट्रेडिंग लेख- अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती


Previous Post

तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा

Next Post

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११

या दोन क्रिकेटपटूंना मिळू शकतो अर्जुन पुरस्कार, बीसीसीआयकडून नावाची शिफारस?

टीम इंडियाला मैदानात उतरवायचा 'मास्टर प्लॅन' तयार, असे आहेत ४ टप्पे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.