---Advertisement---

‘हैदराबादचा संघ कमकुवत, प्ले ऑफमध्ये नाही पोहचणार’; पाहा कोण म्हणतंय असं

On: सोमवार, सप्टेंबर 28, 2020 2:27 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद हा सर्वात धोकादायक संघांपैकी एक मानला जात होता, पण या हंगामात त्यांची कामगिरी खराबच दिसत आहे. डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेल्या या संघाने आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहे. हैदराबादने आपला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध गमावला, तर दुसर्‍या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांचा पराभव झाला. या क्रिकेट हंगामात सनरायझर्स हैदराबादचा संघ कमजोर दिसत असून त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज फॉर्ममध्ये नाहीत, असे बर्‍याच क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. आता भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकणार नसल्याचे भाकित केले आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही!

सनरायझर्स हैदराबादने फक्त दोन सामने खेळले आहेत, पण क्रिकेटर मनोज तिवारी याला वाटते की, या वेळी वॉर्नरची फौज ताकद दाखवत नाही. हा संघ पहिल्या 4 मध्ये नाही तर खालच्या 4 संघांमध्ये  राहिल.

क्रिकबझशी बोलताना मनोज तिवारी म्हणाला की, ”सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाज फॉर्ममध्ये दिसत नाहीत. खलील अहमद निर्धाव चेंडू टाकत आहे, पण तो चौकार मारण्यासारखे चेंडूही टाकत आहे. भुवनेश्वर कुमारपण फॉर्ममध्ये दिसत नाही, लॉकडाऊनमुळेही हे घडत असावे, त्याचा सराव झाला नसावा. आता मनीष पांडे देखील दुखापतग्रस्त आहे, जर त्याची दुखापत गंभीर असेल तर हैदराबाद संघाला कठीण होईल. यावर्षी हैदराबाद संघ कमजोर दिसत आहे. मला वाटतं की, हा संघ गुणतालिकेत खालून 3 किंवा 4 क्रमांकावर असेल.”

आकाश चोप्रानेही हैदराबाद संघावर प्रश्न उपस्थित केले

केवळ मनोज तिवारीच नव्हे तर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही सनरायझर्स हैदराबाद संघाला कमकुवत संघ म्हटले आहे. आकाश चोप्राच्या मते, संघाची मधली फळी युवा खेळाडूंनी भरली आहे. पण ती कमजोर दिसत आहे. तो म्हणाला, “केन विल्यमसनला मधल्या फळीत सामील केल्यास हा संघ पुनरागमन करू शकेल.” यावर सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापन काय योजना करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---