पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर हिनं देशासाठी पहिलं पदक जिंकलं. तिनं 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदकावर निशाणा साधला. यानंतर तिनं मिश्र इव्हेंटमध्ये सरबज्योत सिंगसोबत आणखी एक कांस्य पदक जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत तीन पदके जिंकली असून तिन्ही पदकं नेमबाजीतून आली आहेत. यापैकी दोन पदकं मनू भाकरनं जिंकली आहेत.
मनू आता पॅरिसमधून मायदेशी परतली आहे. आज (8 ऑगस्ट) केंद्रींय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी तिची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी मनूला बक्षिसाचा धनादेशही दिला. मनू भाकर हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. क्रीडा मंत्री मांडविया यांनीही ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
महिलांच्या पिस्तूल नेमबाजीत भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरला 30 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मनूला धनादेश सुपूर्द केला. त्यांनी मनूसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये क्रीडामंत्र्यांनी लिहिलं लिहिले, “आज मी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन कांस्य पदकं जिंकून मायदेशी परतलेल्या मनू भाकरची भेट घेतली आणि तिच्या ऐतिहासिक विजयासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.”
मनू भाकरनं सर्वप्रथम 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकलं. यानंतर तिनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं. यासह ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याशिवाय मनू दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली नेमबाज देखील बनली आहे. मनू नंतर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत भारतासाठी तिसरं पदक जिंकलं. त्यानं 3 पोझिशन शूटींग इव्हेंटमध्ये कांस्यपदकावर निशाणा साधला.
हेही वाचा –
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का
मासिक पाळी असताना 111 किलो वजन उचललं! मीराबाई इतिहास रचण्यापासून थोडक्यात चुकली
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘विनेश फोगट’ला मिळणार या सर्व सुविधा, जाणून घ्या