पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीतून तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. मनू आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली होती. मात्र दोघांनीही हे काम करण्यास नकार दिला आहे. सरबज्योत आणि मनूने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही दिले आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या दोन खेळाडूंना नोकरीत सामील होणे कठीण आहे. हे दोघेही पदकासाठी खेळत असल्याचे मनू आणि सरबज्योत सिंग यांचे म्हणणे आहे की, दोघेही नोकरीसाठी नाही तर सुवर्णपदकासाठी खेळत आहेत. मनू आणि सरबज्योत यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. या दोघांपूर्वी इतर खेळाडूंनाही नोकरीच्या ऑफर आल्या आहेत.
वास्तविक, भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकूण 6 व पदक जिंकले आहेत. भारताला नेमबाजीत 3 पदक मिळाले आहेत. तर एक कांस्य पदक कुस्तीमुध्ये मिळाले, तर पाचवे कांस्य भारतीय हाॅकी संघाला मिळाले आहे. तर गोल्डन बाॅय चोप्राने भालाफेकमध्ये यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये राैप्य पदकावर समाधाव मानावे लागले.
पदकतालिकेवर नजर टाकली तर चीन अव्वलस्थानी आहे. चीनने एकूण 90 पदके जिंकली आहेत. त्यात 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्यपदक आहेत. खरे तर, सर्वाधिक सुवर्ण जिंकणारा देश पदकतालिकेत अव्वल स्थानावर असतो. यूएसए दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 38 सुवर्णांसह 122 पदके जिंकली आहेत. त्यात 42 रौप्य आणि 42 कांस्यपदकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने 18 सुवर्ण जिंकले आहेत. त्याने एकूण 50 पदके जिंकली आहेत. यामध्ये 18 रौप्य आणि 14 कांस्यपदकांचा समावेश आहे. तर भारत या यादीत 71 व्या स्थानी आहे.
हेही वाचा-
“विराट नाही तर हा स्टार खेळाडू माझ्या आवडीचा”, बाॅलीवूड अभिनेत्रीने स्वतः केला मोठा खुलासा
एकही सुवर्णपदक नाही! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास संपला; एकूण कामगिरी निराशाजनकच
6 6 6 6 6.., अफगाणिस्तानच्या स्टार गोलंदाजाला कायरन पोलर्डने धो धो धुतले; पाहा VIDEO