ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मनूनं तिच्या ‘X’ अकाऊंटवर विचारलं की, ती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिनं प्रथम महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर तिनं सरबज्योत सिंगसोबत मिश्र सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक मिळवलं. या ऐतिहासिक कामगिरीसह ती एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
या पोस्टनंतर मनूला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ज्यानंतर तिनं लगेच ही पोस्ट हटवली. मनूच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी दावा केला आहे की, ही पोस्ट मनूनं केली नव्हती. तर काहींनी तिचं अकाऊंट हॅक झाल्याचा दावाही केला. मनू भाकर हिनं अद्याप या पोस्टवर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
She deleted this post 😁
And it’s not a parody account pic.twitter.com/4gvTUqionn— chacha monk (@oldschoolmonk) October 26, 2024
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा’बद्दल बोलायचं झाल्यास हा पूर्वी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जायचा. हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. चार वर्षांच्या कालावधीत खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार मिळतो. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतानं पाच कांस्य आणि एक रौप्य पदकांसह एकूण सहा पदकं जिंकली होती. मनू भाकर भारताची सर्वात यशस्वी खेळाडू ठरली. तिनं नेमबाजीत दोन पदकं जिंकली. स्पर्धेत भारतानं नेमबाजीत तीन आणि कुस्ती, हॉकी आणि ॲथलेटिक्समध्ये प्रत्येकी एक पदकं जिंकलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीनंतर मनू भाकर सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.
हेही वाचा –
रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!
यशस्वी जयस्वालने मोडला 45 वर्षे जुना रेकॉर्ड, याबाबतीत कोहलीसह दिग्गजांना टाकले मागे
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, या विक्रमाबद्दल तुम्हीही जाणून घ्या!