सध्या जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. जगभरातील तब्बल २.५ बिलियन लोकं क्रिकेट पाहतात. अशाप्रकारे फुटबॉलनंतर क्रिकेट हा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे.
क्रिकेट ही इंग्रजांची देण आहे. त्यांनी जिथे-जिथे राज्य केले, क्रिकेटचा विस्तार त्या-त्या ठिकाणी झाला. अशाच प्रकारे हा खेळ भारतातही लोकप्रिय झाला होता. परंतु इंग्रजांनी अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्येही राज्य केले होते. परंतु तिथे क्रिकेटला वाव का मिळाला नाही, याचा आढावा आपण घेणार आहोत.
क्रिकेटचे इतिहासकार ब्रायन स्टोडार्ड यांसारखे दिग्गज सांगतात की, क्रिकेट हा खेळ इंग्रजांशी संबंधित होता. ज्या ठिकाणी क्रिकेटचा विकास झाला, त्या ठिकाणी इंग्रजांच्या पद्धती अवलंबण्यात आल्या. इतकेच नाही तर सुरुवातीला आयसीसीही केवळ राष्ट्रमंडळ देशांपुरता (असे देश जिथे इंग्रजांचे राज्य होते) मर्यादित होता. नंतर १९६५ साली याचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स ठेवण्यात आले होते.
लोकांमध्ये प्रचलित असणारे गैरसमज
१. जलवायू
या देशांमध्ये क्रिकेट प्रसिद्ध न होण्यामागील सर्वसाधारण गैरसमज असा की, कॅनडा आणि अमेरिकेत क्रिकेट खेळणाऱ्या इतर देशांच्या तुलनेत थंड हवामान आहे. तरीही हा सिद्धांत अचूक नाही कारण थंड हवामान असणाऱ्या देशात बेसबॉल, हॉकी, फुटबॉल यांसारख्या उन्हाळी खेळांचा आनंद लुटला जातो. याव्यतिरिक्त क्रिकेटची सुरुवात करणारा देश इंग्लंडमध्येही थंड हवामान आहे.
२. अमेरिकन आणि कॅनेडियन लोकांना धिम्या गतीचा खेळ आवडत नाही
काही लोकांचे असे मत आहे की, अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय नसण्यामागील कारण असे की अमेरिकन लोक क्रिकेटला धिम्या गतीचा खेळ म्हणतात. ते तात्काळ निकालांसाठी नेहमी घाई तसेच चिंता करत असतात. दिलेले हे कारण कसोटी क्रिकेटसाठी योग्य ठरू शकते. परंतु टी२० क्रिकेटसाठी नाही. त्यामुळे हा युक्तिवाद आधार नसलेला सिद्ध होतो.
३. अमेरिकन लोक नियम आणि कायदे कमी प्रमाणात मानतात
आणखी एक गैरसमज आहे की, अमेरिकन लोक नियम आणि कायद्याची इज्जत करत नाहीत. परंतु क्रिकेट हा पूर्णपणे नियमबद्ध असणारा खेळ आहे. तिथे पंचांच्या संमतीशिवाय खेळाडू स्वत: काही करण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यामुळे अमेरिकन लोकांमध्ये क्रिकेटला वाव नाही. परंतु असे काही नसून क्रिकेट प्रमाणेच टेनिस आणि गोल्फही नियमबद्ध असणारे खेळ आहेत. आणि अमेरिकन लोकांना हे खेळ खूप आवडतात.
४. इंग्रजांंबद्दल आहे द्वेष
अनेक इतिहासकार सांगतात की, अमेरिकन आणि कॅनेडियन लोक खूप स्वाभिमानी आहेत. आणि ते कधीच स्विकारणार नाहीत की त्यांच्यावर एकेकाळी इंग्रजांनी राज्य केले होते. त्यामुळे ते इंग्रजांनी सुरु केलेला कोणताही खेळ स्विकारत नाहीत. परंतु या गोष्टीलाही कोणताच आधार नाही. कारण ऑस्ट्रेलियन लोकही खूप स्वाभिमानी आहेत. आणि त्यांनीही नेहमी इंग्रजांची द्वेष केलेला आहे. परंतु असे असूनही ते क्रिकेटवर प्रेम करतात. इतकेच नाहीतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिकाही होते, जी कट्टर प्रतिस्पर्धा असल्याचे दर्शविते.
याव्यतिरिक्त भारतीय उपखंडातही इंग्रजांनी खूप अन्याय केला होता. आणि २० व्या शतकात भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल चांगलाच राग होता. परंतु यामुळे उपखंडात कधी क्रिकेटचे नुकसान झाले नाही.
सर्वात तर्कशुद्ध कारण काय असू शकते जाणून घेऊया
उत्तर अमेरिकेत (यामध्ये कॅनडाचाही समावेश आहे) क्रिकेट लोकप्रिय न होण्यामागील सर्वात तर्कशुद्ध आणि संभावित कारण म्हणजे तिथे उदयास आलेला बेसबॉल हा खेळ. येथे बेसबॉलला वाव तेव्हा मिळाला, जेव्हा इतर देशांमध्ये क्रिकेटची प्रगती होत होती.
तो बिझनेसमॅन ज्याने अमेरिकेत क्रिकेटचे दरवाजे केले बंद
असे म्हटले जाऊ शकते की अमेरिकेतील एक व्यापारी आणि बेसबॉल या खेळाचे निर्माता एजी स्पाल्डिंग यांनी अमेरिकेत क्रिकेटचे दरवाजे बंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांची बेसबॉलच्या लोकप्रियतेबद्दल असणाऱ्या त्यांच्या योगदानामुळे अमेरिकेत क्रिकेटला उतरती कळा लागली. त्यांनी व्यावसायिक लीगची एक प्रणालीचे निर्माण आणि व्यवस्थापन केले. हे अगदी आयपीएलप्रमाणे आहे. जसे सध्याच्या काळात आयपीएलसमोर इतर कोणत्या लीगचा टिकाव लागणे कठीण आहे. अशाच प्रकारे या बिझनेसमॅनने अमेरिकेत बेसबॉलसमोर क्रिकेटची परिस्थिती केली होती. त्यांनी बेसबॉलचे व्यावसायिकरण केले आणि चाहतावर्गही तयार केला. त्यामुळे शेवटी बेसबॉलला अमेरिकेत चांगली लोकप्रियता मिळाली.
क्रिकेटला मुलींचा खेळ म्हणून सादर केले
क्रिकेटला वेगाने मुलींचा खेळ म्हणून सादर केले गेले, जे उच्चभ्रू लोकांसाठी केवळ टाईमपाससाठी बनविण्यात आले होते. आणि त्याचा अमेरिकन लोकांशी काहीही घेणं- देणंं नव्हतं. ‘क्रिकेट हा एक टाईमपास खेळ आहे, तर बेसबॉल एक युद्ध आहे,’ ही घोषणा अमेरिका आणि कॅनडामध्ये लोकप्रिय झाली.
महाविद्यालयांमध्ये खेळ म्हणून बेसबॉल व व्यावसायिक लीग व्यतिरिक्त क्रीडा-आधारित शिष्यवृत्तीमुळेही दोन्ही देशांमधील क्रिकेटला धक्का मिळत आहे. म्हणूनच असे म्हटले जाऊ शकते की ब्रिटीश उच्चभ्रू वर्गाच्या भेदभावाच्या प्रथेमुळे आणि बेसबॉलची समकालीन लोकप्रियता हे मुख्यत: अमेरिका आणि कॅनडामधील क्रिकेट न वाढण्यामागचे कारण असू शकते.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या माध्यमातूनच २०२१ टी२० विश्वचषकाची जोरदार तयारी करणार हे ५ क्रिकेटर
-केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज
-अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
महत्त्वाच्या बातम्या-
-अशी झाली चहल आणि धनश्रीची पहिली भेट; जाणून घ्या प्रेमापासून ‘रोका’पर्यंतचा प्रवास
-केवळ ३ महिन्यात भारतात होणार क्रिकेटचे २४५ सामने, चाहत्यांसाठी आहे खास मेजवानीचे आयोजन
-पंजाबमधील नव्या स्टेडियमला देण्यात येणार ‘या’ माजी कसोटीपटूचे नाव