इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये वेगळा पॅटर्न पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये ज्या फ्रँचायझींनी नवीन कर्णधार नेमले आहेत. संघाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, सध्या प्रेक्षकांना त्यांच्याच खराब कामगिरीने ना खूश करताना दिसत आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार नितीश राणा याचाही समावेश आहे.
कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला दुखापत झाली असल्यामुळे तो आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून बाहेर आहे. अशात त्याच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी नितीश राणा (Nitish Rana) याच्या खांद्यावर सोपविण्यात आली. मात्र, केकेआर संघाची संध्याची परिस्थिती काहीशी ठीक नसून, केकेआर गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच आतापर्यंत 11 सामन्यांपैकी 5 सामने आपल्या नावावर करत, 6 सामन्यांमध्ये संघाला हार पत्कारावी लागली आहे.
राणाची स्वत:च्या फलंदाजीवर प्रतिक्रिया
केकेआर संघाचा नवीन कर्णधार नितीश राणा याने स्टार स्पोर्ट्सशी साधलेल्या संवादादरम्यान मोहम्मद कैफच्या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याच फलंदाजीबाबत वक्तव्य केले. यावेळी तो म्हणाला की, सामन्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या शॉर्ट बॉलवर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. पुढे बोलताना राणा म्हणाला की, “मी सध्या शॉर्ट बॉलवर काम करत आहे आणि ते माझ्या फलंदाजीमधून दिसून येत असेल. खेळादरम्यानच्या माझ्या शॉर्ट बॉलवर अनेकांनी टीका देखील केल्या आहेत.”
‘फलंदाजीवर केले काम’
यावेळी पुढे बोलताना राणा म्हणाला की, “मोठे दिग्गज लोक ज्यांचं नाव मी इथे घेऊ इच्छित नाही. मात्र, त्यांनी मला माझ्या शॉर्ट बॉलच्या पद्धतीविषयी सांगितले. तसेच, काहींनी मला फोन देखील केले. या सर्व घटनेमुळे मला वाईट वाटले आणि त्यामुळे मी माझ्या या खराब कामगिरीवर सराव करण्यास सुरुवात केली. चांगल्या फलंदाजीसाठी मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्यामुळेच आता मी सामन्यांदरम्यान शॉर्ट बॉलवर चांगल्याप्रकारे खेळत असल्याचे सर्वांनी पाहिले असलेच.”
आयपीएल 2023 राणासाठी ठरले खास
केकेआर संघाचा कर्णधार राणा आयपीएल 2023च्या हंगामामध्ये जबरदस्त फलंदाजी करताना दिसून येत आहे. दरम्यान, राणाने 11 सामन्यांमध्ये 326 धावा स्वत:च्या नावावर केल्या असून खेळादरम्यान राणाचा स्टाईक रेट जवळजवळ 146.85 एवढा आहे. काही सामन्यांमध्ये राणाच्या फलंदाजीने संघाला विजयाची चव चाखायला मिळाली आहे.
राणाच्या नावावर 2 अर्धशतके
आयपीएल 2023 हंगामादरम्यान राणाने दोन अर्धशतक ठोकले आहेत. त्यातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 75 असून रिंकू सिंगनंतर आपल्या संघासाठी जास्त धावा करणारा राणा दुसरा फलंदाज बनला आहे. गुरुवारी (दि. 11 मे) 7.30 वाजता ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) संघ आयपीएल 2023चा 56वा सामन्यात आमने-सामने होते. (many were criticising my technique against the short ball and that really hurt me said captain nitish rana)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Toss: प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी कोलकाता अन् राजस्थान आमने-सामने, ‘या’ जबरदस्त गोलंदाजाचे कमबॅक
‘धोनीने आता थांबले पाहिजे’, विश्वविजेत्या कर्णधाराचे स्पष्ट मत