आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. पण सामन्याच्या काही तासांआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यानंतर नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या हाती सोपवली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात महेंद्रसिंह धोनी विकेटकीपर फलंदाज म्हणून पहायला मिळणार आहे.
याबरोबरच, एम एस धोनीच्या नेतृत्त्वामध्ये 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच ऋतुराज गायकवाड 2019 मध्ये या संघात सामील झाला आणि तेव्हापासून तो 1797 धावांसह CSK साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक 1245 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 अर्धशतके आणि 1 शतक केलं आहे.
अशातच सीएसकेचा कर्णधार झाल्यावर ऋतुराजने सीएसकेच्या सोशल मीडियावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने कर्णधारपद मिळाल्यावर आनंद व्यक्त केला आहे. त्यानंतर बोलताना तो म्हणाला आहे की, ‘कर्णधार झाल्यानंतर भारी वाटत आहे. तसेच हा माझा एका प्रकारे माझा सन्मानच आहे. तसेच माझ्या सोबत मला मार्गदर्शन करायला माही भाई आहे. जड्डू भाई आहे अज्जू भाई आहे. तोही एक महान कर्णधार आहे. त्यामुळे जास्त काही चिंता नाहीये. आम्ही सामना एन्जॉय करण्यावर भर देणार आहोत.’
दरम्यान, ऋतुराज कॅप्टन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ऋतुराजकडे कर्णधारपद देण्याचा निर्णय एमएस आणि फ्लेम यांचा होता. तसेच यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात आरसीबीविरूद्ध सीएसके संघ उतरणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुढीलप्रमाणे : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, एन सिमरंत, एन. सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.
महत्त्वाच्या बातम्या-
- धोनी कर्णधारपदावरून पायउतार होताच विराट कोहलीची प्रतिक्रिया तुफान व्हायरल
- राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ऐन वेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज आयपीएल हंगामातून बाहेर