भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने शुक्रवारी(१२ मार्च) एका खास विक्रमाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवल्या गेलेल्या तिसर्या सामन्यात मिताली राजने हा कीर्तिमान गाठला. तिने या सामन्यात ३६ धावांची खेळी करतांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावांचा टप्पा गाठला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारी मिताली जगातील केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. तर भारतातील मात्र ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली. आजच्या दिवशी तिने हा टप्पा गाठल्याने एक खास योगायोग देखील जुळून आला. भारताचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजूमदारने ट्विट करत हा योगायोग आणि खास बाब लक्षात आणून दिली.
मार्च महिना ठरला खास
मिताली राजने आजच्या दिवशी म्हणजे १२ मार्च २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. असे करणारी ती भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावांचा टप्पा पार केला होता. विशेष म्हणजे गावसकर यांनी मार्च महिन्यातच हा कारनामा केला होता. त्यांनी ७ मार्च १९८७ रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध खेळतांना ही कामगिरी केली होती.
अमोल मुजुमदार यांनी ट्विट करत हीच गोष्ट लक्षात आणून दिली. यात ते म्हणाले, “७ मार्च १९८७ आणि १२ मार्च २०२१. १० हजार धावा पूर्ण. हा टप्पा गाठणारे दोन्ही, महिला आणि पुरुष क्रिकेटपटू. यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवले जाईल.”
https://twitter.com/amolmuzumdar11/status/1370360223974580224
दरम्यान, आजच्या सामन्यात मितालीने हा खास विक्रम नोंदवून देखील भारतीय महिला संघाला पराभव स्विकारावा लागला. भारताने दिलेले २४९ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे ४६.३ षटकांतच पूर्ण केले. यासह तीन सामन्यांची वनडे मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या –
“हेल्मेट घालूनही तुम्ही शून्यावर बाद होऊ शकता, त्यामुळे…”, उत्तराखंड पोलिसांनी केले कोहलीला ट्रोल
भारताच्या ‘या’ खेळाडूने गाठला १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पल्ला, बीसीसीआयने केले अभिनंदन
अरर! विराट केवळ शुन्यावर बाद तर झालाच पण ‘या’ नकोशा यादीत गांगुली, धोनीलाही टाकले मागे