---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला मेगा लिलावात 10 कोटी रुपये मिळणार, डेल स्टेनचा अंदाज

On: गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024 3:05 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू मार्को जॅन्सनने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्फोटक अर्धशतक झळकावले. यापूर्वी त्याने गोलंदाजीत उत्तम कौशल्य दाखवले होते आणि विकेट्सही घेतल्या होत्या. डेल स्टेनने जॅन्सनबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात जॅनसेनला 10 कोटी रुपये मिळू शकतात. असे त्याचे म्हणणे आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव होणार आहे.

वास्तविक, तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात मार्को जॅनसेनने चमकदार कामगिरी केली. त्याने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर त्याने बॅटनेही अप्रतिम कामगिरी केली. त्याने 54 धावांची खेळी खेळली. जॅनसेनची कामगिरी पाहता डेल स्टेनने मोठा अंदाज बांधला आहे. त्याने ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, जॅनसेन हा 10 कोटींचा खेळाडू आहे.

जॅनसेनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आतापर्यंत 17 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 17 विकेट घेतल्या आहेत. त्यासोबत त्याने जॅनसेनने 139 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 35 विकेट घेतल्या. तसेच 13 कसोटी सामन्यात त्याने 49 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आता लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागणार आहे. जॅनसेनलाही मोठी रक्कम मिळू शकते. इतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत जे लिलावाद्वारे चांगली कमाई करू शकतात. हा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. गेल्या हंगामाचा लिलावही परदेशात झाला होता.

हेही वाचा-

3 दिग्गज फिरकीपटू जे आयपीएल 2025 मेगा लिलावात अनसोल्ड राहू शकतात
“देशासाठी शतक झळकावण्याचं माझं स्वप्न… “,सामना संपल्यानंतर तिलक वर्मा भावूक, या व्यक्तीला दिले श्रेय
IND VS SA; वरुण चक्रवर्तीने मोडला आर आश्विनचा मोठा रेकाॅर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---