---Advertisement---

ही कसली भानगड! मार्कस स्टॉयनिसच्या हातात दिसली ‘हल्क’ची मूर्ती, पण का?

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 7:33 AM
---Advertisement---

अबु धाबीमध्ये रविवारी (८ नोव्हेंबर) आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभवाचे पाणी पाजले. त्यामुळे आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. यामध्ये अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसचा मोलाटा वाटा राहिला. परंतु हा खेळाडू सामना झाल्यानंतर हातात हल्कची (मार्व्हल युनिव्हर्स चित्रपटांमधील एक काल्पनिक पात्र) छोटीशी मुर्ती घेऊन दिसला. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधान आले आहे.

स्टॉयनिसने सांगतिले कारण

सामना झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने स्टॉयनिसची मुलाखत घेतली होती. इंडियन प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यांचा मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अय्यर स्टॉयनिसला हातात हल्कची मुर्ती घेऊन येण्यामागचे कारण काय आहे? असा प्रश्न विचारतो. यावर स्टॉयनिस उत्तर देत म्हणतो की, “मी जेव्हाही एखाद्या फलंदाजाची विकेट घेता. त्यानंतर त्या विकेटचा आनंद साजरा करताना अगदी हल्कसारखा दिसतो. त्यामुळे नेहमी मी त्याची मुर्ती माझ्यासोबत ठेवत असतो.”

स्टॉयनिसची दिल्ली-हैदराबाद सामन्यातील कामगिरी

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्टॉयनिसने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्याने फलंदाजी करताना २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. त्याने गोलंदाजी करताना ३ षटकात ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याने फक्त २६ धावा खर्च केल्या. एवढेच नव्हे, तर त्याने हैदराबादच्या श्रीवत्स गोस्वामीचा झेलही पकडला. या शानदार प्रदर्शनासाठी स्टॉयनिसला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ऐसा पहली बार हुआ है १२-१३ सालो में’, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना गाठणाऱ्या दिल्लीबद्दल भन्नाट ट्विट

फायनलमध्ये सलामीला फलंदाजी करणार का नाही?, पाहा काय म्हणाला मार्कस स्टॉयनिस

आयपीएल २०२०ची अंतिम लढाई लढण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, म्हणाला…

ट्रेंडिंग लेख-

लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू

मुंबईवर भारी पडणार दिल्लीचा संघ; ‘हे’ चार खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---