---Advertisement---

मुंबईचा विजयरथ रोखणाऱ्या मोहसीनचा फॅन बनला स्टॉयनिस, खास शब्दांत गायले गोडवे

On: गुरूवार, मे 18, 2023 3:15 PM
---Advertisement---

मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 चा 63 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला 8 धावांनी निराशाजनक पराभव पत्करावा लागला. लखनऊच्या या विजयाचा नायक युवा वेगवान गोलंदाज मोहसीन खान हा ठरला. त्याने अखेरच्या षटकात 11 धावांचे रक्षण करत संघाला एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्याच्या या दमदार कामगिरीनंतर संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याने त्याचे कौतुक केले.

टीम डेव्हिड व कॅमेरून ग्रीन या आक्रमक फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना त्याने शेवटच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रत्येकी एक-एक धाव दिल्या. शेवटच्या तीन चेंडूंवर मुंबईला 9  धावा हव्या होत्या. मात्र, डेविड आणि ग्रीन हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. षटकातील चौथा चेंडू पुन्हा निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर ग्रीनने एक, तर शेवटच्या चेंडूवर डेव्हिड 2 धावा करू शकला. अशाप्रकारे त्याने संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना लखनऊचा अष्टपैलू स्टॉयनिसने मोहसीन याचे कौतुक करताना म्हटले,

“त्याने दाखवलेला खेळ शानदार तुम्ही एका वर्षानंतर दुखापतीनंतर संघात पुनरागमन करता आणि दोन उत्कृष्ट फलंदाजांविरुद्ध धावांचा बचाव करता, ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट म्हणावी लागेल.”

या सामन्याचा विचार केल्यास, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊने स्टॉयनिसच्या 89 धावांच्या जोरावर 3 बाद 177 धावा केल्या. मुंबईपुढे विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात, मुंबईने 20 षटकांत 5 विकेट्सच्या नुकसानावर 172 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी लखनऊ संघ 5 धावांनी विजयी झाला.

(Marcus Stoinis Praised Mohsin Khan After Brillant Last Over Against Mumbai Indians)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले ऑफ्सची रेस रंगात! पुन्हा भिडणार मुंबई-सीएसके? जाणून घ्या समीकरणे 
चाहत्यांनी विराट..विराट म्हणून डिवचल्यानंतर अशी होती नवीन उल हकची रिऍक्शन, पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---