आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहलीसोबत गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांचा झालेला वाद चर्चेत आहे. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला आणि सामन्यातील वाद सर्वत्र चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या लखनऊ विरुद्ध मुंबई या सामन्यात चाहत्यांनी क्षेत्ररक्षण करत असलेल्या नवीन याला डिवचले.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आयपीएल 2023मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळत आहे. 1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात नवीनने थेट विराट कोहली (Virat Kohli) याच्याशीच पंगा घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतरही त्याने मैदानाबाहेर इंस्टाग्रामवर काही अशा स्टोरी पोस्ट केल्या त्यामूळे तो जाणीवपूर्वक विराटला लक्ष करत असल्याचे दिसून आले. या कारणाने त्याच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होतेय.
Lucknow crowd chanting 'Kohli, Kohli' in front of Naveen Ul Haq. ????????????#viratkohli pic.twitter.com/1UikMTGLjZ
— ????????????????????????????_???????????????????? (@Imlakshay_18) May 17, 2023
असे असतानाच मंगळवारी (16 मे) झालेल्या लखनऊ विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात नवीन याला पुन्हा एकदा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना, काही चाहत्यांनी त्याला पाहून विराट विराट अशी हाक मारायला सुरुवात केली. मात्र, त्यावरही संतप्त न होता त्याने आणखी मोठ्याने ओरडा असा इशारा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळत असलेल्या नवीन याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र, विराटसोबत झालेल्या वादानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तसेच, सोशल मीडियावर देखील लोकांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. मात्र, लखनऊ संघाच्या यशात त्याचा मोठा वाटा दिसून येतो.
(Fans Chants Virat Virat At Lucknow For Naveen Ul Haq Video Goes Viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ